Fatorda Children Park Dainik Gomantak
गोवा

Children Park : मडगावच्या उद्यानाला टाळे ; मुलांची गैरसोय

नाराजीची भावना : सायंकाळी पाचच्या सुमारास उद्यान उघडताच होते गर्दी; दखल घेण्‍याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda : जसजसा परीक्षेचा शेवटचा दिवस जवळ यायचा, तसतसा उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘काय काय मजा करणार?’ असा सवाल मुलांना सतावत असतो. एप्रिल-मे महिन्यात सुरू होणारी ही सुट्टी लहान मुलांसाठी मोठी पर्वणीच असते. या सुट्टीतील मुख्य विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे उद्याने व चिल्ड्रन पार्क. या सुट्टीत ही ठिकाणे मुलांच्या गर्दीने फुलून जातात.

मात्र मडगावातील नगरपालिका उद्यान दिवसभर बंद असल्याने मुलांची मोठी गैरसोय होत आहे. तेथे आपल्‍या पाल्‍यांना घेऊन आलेल्‍या पालकांना आल्‍या पावली माघारी फिरावे लागत आहे. त्‍यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवसभर बंद ठेवण्यात येत असलेल्या या उद्यानाचा एका बाजूचा ताबा वन विभाग कार्यालयाकडे आहे. या उद्यानात झोपाळे, घसरगुंडी व मुलांच्या मनोरंजनासाठीची इतर उपकरणे आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास ते खुले करण्यात येत आहे.

पण सध्‍या शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे मुले आपल्या पालकांना घेऊन कोणत्याही वेळी उद्यानात मजा करायला धडकतात. मात्र उद्यानाच्‍या गेटला ठोकलेले टाळे बघून मुले नाराज होतात. पालकांचाही हिरमोड होतो.

सुट्टीच्‍या दिवसांत तरी बालोद्यान खुले ठेवा

सुट्टीच्या काळात तरी बालोद्याने पूर्ण वेळेसाठी खुली ठेवली पाहिजेत. आपल्या कामातून वेळ काढून आपल्‍या मुलांच्या आग्रहास्‍तव त्‍यांना मडगाव पालिकेच्या उद्यानात दुपारी 12 च्या सुमारास झोपाळ्यात बसविण्यासाठी घेऊन आलेले नारायण नाईक यांना गेटला टाळे पाहून माघारी फिरावे लागले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मुलांच्या सुट्टीच्या काळात तरी हे ठिकाण पूर्ण दिवसासाठी खुले ठेवण्‍यात यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT