Molestation Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: झाड कापण्यावरुन वाद; कोरगावात महिला पंच सदस्याचा विनयभंग केल्याप्रकरणी बापलेकाविरोधात तक्रार

Goa Assault Case: भाईड-कोरगाव येथील वयस्कर महिला चंपावती धारगळकर यांच्या घरावर असलेले झाड धोकादायक स्थितीत होते. हे झाड कापण्यासाठी या महिलेने कोरगाव पंचायतीकडे अर्ज केला होता.

Pramod Yadav

मोरजी: कोरगाव येथे धोकादायक झाडे कापण्यासाठी गेलेल्या सरकारी यंत्रणेच्या कामात व्यत्यय आणून स्थानिक महिला पंचसदस्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पेडणे पोलिस स्थानकात उदय प्रभुदेसाई आणि त्यांचा मुलगा उगम प्रभुदेसाई यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पीडित पंच महिलेने सांगितले की, भाईड-कोरगाव येथील वयस्कर महिला चंपावती धारगळकर यांच्या घरावर असलेले झाड धोकादायक स्थितीत होते. हे झाड कापण्यासाठी या महिलेने कोरगाव पंचायतीकडे अर्ज केला होता. त्यानुसार पंचायतीने आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत त्याची माहिती पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाला दिली होती.

उपजिल्हाधिकारी कार्यालयाने हे झाड कापण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस संरक्षणात हे झाड कापण्यासाठी शुक्रवारी सकाळी सरकारी यंत्रणा गेली असता तेथे उदय प्रभुदेसाई आणि त्यांचा मुलगा उगम यांनी झाड कापणाऱ्या व्यक्तींना अडथळा आणला. तसेच झाड कापण्यासाठी मज्जाव केला.

त्यावेळी स्थानिक पंचांनी पोलिसांनी बोलावून घेतले. त्यावेळी तिच्याशी हुज्जत घालून तिचा व्हिडिओ आणि फोटो काढण्याचे काम उदय प्रभुदेसाई यांनी केले. तसेच तिचा हात ओढून विनयभंग केल्याची तक्रार पेडणे पोलिस स्थानकात नोंदविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT