Betoda Accident Dainik Gomantak
गोवा

Betoda Accident: बेतोडा जंक्शनवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; रुग्णालयात नेण्याआधीच सोडला प्राण

Betoda Accident News: बेतोडा येथील धोकादायक समजल्या जाणाऱ्या जंक्शनवर दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

फोंडा: बेतोडा येथील धोकादायक समजल्या जाणाऱ्या जंक्शनवर दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुण आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून फोंडा उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की, दोघांनीही रुग्णालयात नेण्याआधीच प्राण सोडले. आदित्य देसाई (बेतोडा) आणि ईशा गावस ( केरी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या मृतकांची नावे आहेत. अदिती उमेश मांजरेकर (पर्ये, सत्तरी) ही दुसरी तरुणी जखमी असून योगेश परशुराम पाटील (22, म्हाळशी, कुर्टी) हा तरुण गंभीर जखमी आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फोंडा येथील नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तातडीने फोंडा उपजिल्हा रुग्णालय गाठले आणि जखमींची आणि कुटुंबीयांची विचारपूस केली. रुग्णालयात (Hospital) या दरम्यान शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मते, बेतोडा जंक्शनवर वाहतुकीसंदर्भात योग्य ती व्यवस्था नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल किंवा स्पीड ब्रेकरची नितांत गरज असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

पोलिस तपास सुरु

फोंडा पोलिसांनी अपघाताची (Accident) नोंद करून तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरुन अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT