Goa Pilgao Farmers Dainik Gomantak
गोवा

Goa Pilgao Farmers: प्रसंगी मुलांबाळांसह जीवन संपवू; पिळगावमधील शेतकरी आक्रमक

Pilgao Mining: खाण व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रांत

गोमन्तक डिजिटल टीम

खाण व्यवसायामुळे उद्‍ध्वस्त झालेली आमची शेती पूर्ववत आम्हाला द्या, अशी मागणी करीत पिळगावमधील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक बनले आहेत.

आमची शेती जर आम्हाला मिळाली नाही. आणि वेदांता (सेसा) कंपनीने जर जबरदस्तीने शेतजमिनीतून गेलेल्या रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्याचा प्रयत्न केलाच, तर रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखू. प्रसंगी मुलांबाळांना घेऊन शेतीतच जीवन संपवू, असा इशारा पिळगावमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.

वेदांता (सेसा) कंपनीकडून पिळगाव सारमानसमार्गे खनिज वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पिळगावमधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) सायंकाळी उशिरा पिळगाव येथील श्री महादेव मंदिरात शेतकऱ्यांची एक तातडीची बैठक झाली. समाजसेवक स्वप्नेश शेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस सरपंच मोहिनी जल्मी यांच्यासह अन्य पंचसदस्य, माजी सरपंच महेश वळवईकर, विष्णू गिमोणकर, सुधाकर वायंगणकर, अनिल सालेलकर यांच्यासह पन्नास हून अधिक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

शेती वाचविण्यासाठी काय करता येईल. त्याविषयी स्वप्नेश शेर्लेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पंचायत शेतकऱ्यांच्या पाठीशी

खाण व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रांत आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेती व्यवसाय बंद झाला आहे. स्थानिक कामगारांनाही कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. पंचायत शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यांच्या हक्काची शेती त्यांना मिळालीच पाहिजे, असे सरपंच मोहिनी जल्मी यांनी स्पष्ट केले.

उदरनिर्वाहासाठी शेती हवी!

गावातील लोकांना रोजगार मिळेल, या आशेने खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर आम्ही शेतीवर पाणी सोडले. मात्र, आता खाण कंपनीने गावावरच अन्याय केला आहे. खाण व्यवसायामुळे आमचे पूर्वज कसत असलेली शेती नष्ट झाली आहे. खाणमाती आदी गाळ साचून शेतजमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून शेती पडीक पडल्या आहेत. खाण कंपनीकडून नुकसान भरपाईही धड मिळत नाही. आता तर वेदांता (सेझा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना काढून त्यांना वाऱ्यावर टाकले आहे, अशी व्यथा माजी सरपंच तथा शेतकरी महेश वळवईकर यांनी मांडली. उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना शेती हवी आहे. शेतीसाठी आम्ही मुलांबाळांसह जीवन संपवायलाही तयार आहोत,असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT