Walpai

 

Dainik Gomantak

गोवा

वाळपईत धरणे आंदोलनात बळीराजाचा हुंकार

सरकारने तत्काळ खेती, माकड, शेकरा यांना उपद्रवी घोषीत करुन त्यांच्या बंदोबस्तासाठी व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी करीत ही माणसाच्या अस्तित्वाची लढाई असून जोवर माकड, खेती उपद्रवी होत नाहीत.

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यात शेतकरी, बागायतदार वर्ग वन्यप्राण्यांच्या अती आक्रमणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे हातचे अन्नच हातातून निसटत आहे. रानडुक्करा बरोबरच माकड, खेती जास्त प्रमाणात पिकाची नुकसानी करीत आहे. म्हणूनच सरकारने (Government) तत्काळ खेती, माकड, शेकरा यांना उपद्रवी घोषीत करुन त्यांच्या बंदोबस्तासाठी व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी करीत ही माणसाच्या अस्तित्वाची लढाई असून जोवर माकड, खेती उपद्रवी होत नाहीत. तोवर आता मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत वाळपईत बागायतदारांनी हुंकार केला आहे. वाळपईत (Walpai) सत्तरी शेतकरी मंचतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन व रँलीचे आयोजन केले होते.

मंचचे अध्यक्ष अशोक जोशी, सचीव माणिकराव राणे, पदाधिकारी शाणू नेने, आनंद काळे, उदय सावंत, विनय बापट, वामन बापट, महिला प्रतिनिधी सौ. सुरेखा बर्वे, सौ. लक्ष्मी हरवळकर, सौ. रोशन देसाई, मिलींद गाडगीळ, विश्वेश प्रभू आदींची उपस्थिती होती. अशोक जोशी म्हणाले वन्यप्राण्यामुळे लोकांनी शेती करणे सोडून दिले आहे. सरकारने रानडुक्कराला उपद्रवी घोषीत केले खरे, पण त्यांना मारण्यासाठी बंदुकीचा परवाना देणे, नुतनीकरण करणे या गोष्टी सरकारने अंमलात आणल्या पाहिजेत. तसेच माकड, खेती यांनाही उपद्रवी क्ुतीव्दारे जाहीर केले पाहिजे.

राज्यात खनिज खाणीसाठी एका रात्रीत दहा किलोमीटरचा बफर झोन एक किलोमीटर आणला होता. तसाच बागायतीसाठी बफर झोन एक किलोमीटर केला पाहिजे. शेतीसाठी बफर झोन दहा किलोमीटर असल्याने बंदुकीचा परवाना देण्यास अडचण आणली आहे. आमचे पाच वर्षे आंदोलन सुरु आहे. अनेकवेळा निवेदने दिली आहेत. पंचायत क्षेत्रातही काम केले. उपद्रवींमुळे कष्टाचे अन्न गेले. कष्ट फुकट जात आहेत. सरकार देत असलेले पावला पावलावरील अनुदान काय उपयोगाची. प्राण्यांना संरक्षण दिले जाते. मनुष्याला नाही. सामान्याची व्यथा कथा कोणाला कळणार हा गहन प्रश्न बनला आहे. नुकसान भरपाई हा पर्याय नव्हे, पर्यावरण लोकांनी राखले आहे. माणिकराव राणे म्हणाले बागायती कष्टाची रसातळाला गेली आहे. सरकार दरबारी कागदपत्रेच दिली. पण पदरी अपयश हाती आले. काही फायदा नाही. सरकारने केराची टोपली दिली आहे.

त्यातुन आम्ही आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण कसे होणार ? गोवेकरांना नारळ खाता येत नाही. केरळ वासीय श्रीमंत झाले. गोवा बागायतदार संस्थेच्या संचालिका सौ. सुरेखा बर्वे म्हणाल्या जंगलात वनखात्याने पाणी साठा वाढविला पाहिजे. जंगलात अन्न तयार केले पाहिजे. सरकारने आम्हाला पुढील पाऊल टाकण्यास भाग पाडू नये. आता पाऊल मागे घेणार नाही. विश्वेश प्रभू म्हणाले हिंस जनावरे त्रासादयाक ठरले आहे. वनखाते सतावणूक करते. श्री. उदय सावंत म्हणाले आपल्या पिढीसाठी कुटुंबासाठी महत्वाचा गंभीर विषय आहे. पर्यावरण वडीलोपार्जित लोकांनी राखले. त्यांना पर्यावरणाची कळवळ होती. म्हणून ही आता अस्तित्वाची लढाई आहे. आज पर्यंत गप्प होतो. रडलो. मात्र आता नाही. आक्रमक निश्चीतच होणार आहे. निवडणूकीत सहा महीने बंदुका पोलीस स्थानकात ठेवल्या जातात.

बंदुका क्ुषी शेती रक्षणासाठी आहेत. विनय बापट म्हणाले अभयारण्य कोणाच्या जीवावार करताय ? आजची परिस्थिती पाहून एकेकाळी शेती होती असे म्हणण्याची पाळी येणार आहे. लोकांनी पडीक जमीनी पिकविल्या पाहिजेत. नाहीतर सरकार कधी ताब्यात घेतील सांगता येणार नाही. हा पिकाचे रक्षण करण्यासाठी लढा आहे. आम्ही घाम गाळून पिकवतोय त्याचे मोल हवे आहे. बागायतदारांनो आता स्वत:तील कुंभकर्ण संपवा. जागे व्हा. आपला उपद्रव दाखवा तरच सरकार घाबरणार आहे. एक एकर जागा आहे त्यांनाही बंदुका द्या. बंदुका ताब्यात घेऊ नका. पिकाच्या रक्षणाच्या बंदुका घेऊ नका. दुर्दैवाने कायदा हातात घेण्याची पाळी देऊ नका. सरकरला डोकी दिसतात विचार नाहीत असे बापट म्हणाले. गोवा बागायतदारा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर म्हणाले अनेक वर्षापासून बागायतदार संस्था काम करीत आहे.

सरकारने वन्यप्राण्यांना उपद्रवी घोषीत करावे. वाळपई शहीद स्तंभाकडे शहीदांना श्रध्दांजली वाहून रँलीला प्रारंभ करण्यात आला. बाजारात प्रकट कार्यक्रम झाला. नंतर उपजिल्हाधिकारी कार्यालय बाहेर धरणे धरण्यात आली. यावेळी अँड. शिवाजी देसाई, अनिल नेने, दशरथ मांद्रेकर, मनोहर गावकर, सौ. लक्ष्मी हरवळकर, विनायक सावईकर, अँड. सुदिन मराठे, शहाजी देसाई, मनिषा उसगावकर, सौ. रोशन देसाई, क्ुष्णा कामत, अँड. गणपत गावकर यांनी विचार मांडले. येत्या पंधरा दिवसात गावागावात प्रत्येक मंदिरात 'सरकारला बुध्दी येऊ दे' असे सर्वांनी देवाला सांगणे करण्याचे ठरविण्यात आले. व पंधरा दिवसांनी पुन्हा वाळपईत एकत्र येऊन सार्वजनिक सांगणे करण्याचे निश्चीत झाले आहे. त्यादिवशी पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. वामन बापट यांनी सुत्रनिवेदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT