Farmagudi Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Farmagudi Hit And Run Case: फर्मागुडी 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपी पोलिसांना आला शरण; विद्यार्थीनीवर उपचार सुरू

अक्षय टिळक (21, खांडेपार) असे वाहनचालकाचे नाव असून तो फोंडा पोलिसांना शरण आला आहे.

दैनिक गोमन्तक

Farmagudi Hit And Run Case: फोंड्यात एक 'हिट अँड रन'चा प्रकार समोर आला आहे. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एका अज्ञात वाहनाची धडक बसून एनआयटीची विद्यार्थीनी प्रीती शर्मा (28, हरियाणा) हिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाल्याची घटना काल (12 जून) घडली आहे. याबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थिनीला धडक मारून घटनास्थळावरून पळ काढलेल्या वाहनचालकाने आपला गुन्हा कबूल केला आहे. अक्षय टिळक (21, खांडेपार) असे वाहनचालकाचे नाव असून तो फोंडा पोलिसांना शरण आला आहे. यासंदर्भात फोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

काल एनआयटी विद्यार्थीनी प्रीती शर्मा रस्त्याने जात असताना अक्षय टिळक याने भरधाव वेगात येऊन तिला धडक दिली होती. यामध्ये प्रीती जखमी झाली असून तिच्यावर फोंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आजही अशीच एक घटना गिरीत घडली आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने 53 वर्षीय सिक्युरिटी गार्डला जोरदार धडक दिली. यामध्ये अनिल कांता सिंग हे जबर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी कारचालक रमेश प्रेमचंद बरड याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT