Mapusa | Shri Dev Bodgeshwar Sansthan Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्‍हापशातील प्रसिद्ध देवस्‍थान बोडगेश्‍‍वराचा जत्रोत्सव 4 जानेवारीपासून होणार सुरु

Mapusa: म्‍हापशात बोडगेश्‍‍वराचा जत्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa: येथील जागृत देवस्थान श्री देव बोडगेश्वर संस्थानचा 88वा जत्रोत्सव व 30वा वर्धापनदिन सोहळा दि. 4 ते 15 जानेवारी यादरम्यान साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

पहिल्‍या दिवशी म्‍हणजे दि. 4 रोजी श्री देव बोडगेश्‍‍वच्या मूर्तिप्रतिष्ठापनेच्‍या 30व्‍या वर्धापनदिनानिमित्त सकाळी 10 वाजता लघुरुद्र, पूजा, दुपारी 12 वाजता सोन्याचा दांडा श्रीचरणी अर्पण केला जाईल. यावेळी चंद्रशेखर सिंग व सागर माने यांच्या बॅण्डपथकासह शंखनाद सादर केला जाईल. आरती, तीर्थप्रसादानंतर महाप्रसाद होणार आहे.

संध्याकाळी 4 वाजता रांगोळी स्पर्धा, गोड पाककला स्पर्धा व 5 ते 9 व 10 ते 14 वर्षे वयोगटासाठी वेशभूषा स्पर्धा होईल. 7 वाजता सुहासिनींतर्फे दीपोत्सव, रात्री 8.30 वाजता म्हापसा ओम सत्य साई सेवा मंडळातर्फे प्रार्थना, भजन, रात्री 9.30 वाजता कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ (नेरुल-कुडाळ) प्रस्तुत ‘अजिंक्यतारा : 2’ हा नाट्यप्रयोग होईल.

गुरुवार दि. 5 रोजी श्री देव बोडगेश्‍‍वराचा 88वा जत्रोत्सव दुपारी 12 वाजता गाऱ्हाणे व आरतीसह साजरा होईल. त्यानंतर महाप्रसाद, संध्याकाळी 4 वाजता नवदुर्गा दिंडी पथकातर्फे दिंडीचा कार्यक्रम, 6 वाजता पांडुरंग राऊळ आणि साथींचे भजन, रात्री. 8.30 वाजता अंतरा व साथी कलाकारांतर्फे (महाराष्ट्र) ‘मुद्रा’ हा नृत्याचा कार्यक्रम होईल. रात्री 12 वाजता प्रवीण कळंगुटकर दशावतारी मंडळातर्फे ‘पुनर्जन्म’ हा नाट्यप्रयोग सादर करण्‍यात येईल.

शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 5 वाजता बोरी नवदुर्गा मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, 7 वाजता ‘नृत्य मार्ग’ हा कार्यक्रम श्वेता व साथींतर्फे (मोरजी) सादर होईल. रात्री 8 वाजता म्हापसा पालिकाक्षेत्र मर्यादित एकेरी नृत्यस्पर्धा तर रात्री 11 वाजता श्रींची आरती व प्रार्थना होईल.

शनिवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा पिकअप चालक संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता बालभवनाच्या विद्यार्थ्यांतर्फे ‘रंगारंग’ कार्यक्रम, रात्री 8.30 वाजता ‘मनोमय’ हा सिद्धकला डान्स अकादमी अ‍ॅण्ड इव्हेंटस् व जान्हवी बोंद्रे प्रस्तुत सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि. 8 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा मासळी विक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता लेहरे ग्रुपचा ‘स्वराभिषेक’ हा सांगीतित कार्यक्रम व रात्री 8 वाजता आरडीएक्स क्रीव महाराष्ट्रतर्फे ‘दिव्यशक्ती’ कार्यक्रम सादर करण्‍यात येणार आहे. सोमवार दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता म्‍हापसा रिक्षाचालक संघटनेतर्फे (कदंब बसस्थानक) श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता कला व संस्कृती संचालनालय पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री 8 वाजता ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे.

संगीतरसिकांना मेजवानी

मंगळवार दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता पं. प्रवीण गावकर व पल्लवी पाटील यांचा ‘भक्तिभाव’ हा संगीताचा कार्यक्रम तर रात्री 8 वाजता ‘दृष्टी’ ग्रुपतर्फे (महाराष्ट्र) ‘नृत्यताल’ हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि. 11 रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा भाजीविक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 6 वाजता संदेश खेडेकर यांचा ‘स्वरसंदेश’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम तर रात्री 8 वाजता महेश व सहकाऱ्यांतर्फे (महाराष्ट्र) जागृती फोक व फ्युजन कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 12 रोजी संध्याकाळी 6 वाजता भजनाचा कार्यक्रम व रात्री 8 वाजता ‘ईश्वरशक्ती’ हा सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

भजन, फुगडी स्‍पर्धा

शुक्रवार दि. 13 रोजी संध्या. 5 वा. भजन स्पर्धा तर शनिवार दि. 14 रोजी संध्या. 6 वा. फुगडी स्पर्धा होणार आहे. रविवार दि. 15 रोजी संध्या. 5 वा. ‘सूर-ईश्वर’ हा विनय महाले व साथींचा अभंग, भक्ती, नाट्य व भावगीतांचा कार्यक्रम होईल. रात्री 8 वाजता लोकनृत्य स्पर्धा होऊन जत्रोत्सवाची सांगता होईल. भजन, फुगडी व लोकनृत्य स्पर्धा नावनोंदणीसाठी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT