Goa Fraud Case  Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case : पैसे उकळण्यासाठी ‘त्या’ डॉक्टरवर आरोप: आयएमए

प्रसिद्ध डॉ. प्रकाश अवदी यांच्याकडून पैसे उकळण्यासाठीच २७ वर्षीय युवतीने विनयभंगाचा आरोप केला आहे, असा दावा मडगाव ‘आयएमए’ ने केला आहे.

Shreya Dewalkar

Goa Fraud Case : प्रसिद्ध डॉ. प्रकाश अवदी यांच्याकडून पैसे उकळण्यासाठीच २७ वर्षीय युवतीने विनयभंगाचा आरोप केला आहे, असा दावा मडगाव ‘आयएमए’ ने केला आहे. त्यामूळे अवदी यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या, सोमवारी मडगाव येथील डॉक्टर्स सकाळी पोलीस स्थानकावर जमणार आहेत.

डॉ. अवदी यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार सासष्टी येथील एका युवतीने मडगाव पोलीस स्थानकात दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून उद्या 21 रोजी सकाळी 10 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

‘आयएमए’च्या मडगाव शाखेच्या अध्यक्ष डॉ. बबिता आंगले यांनी आज मडगाव येथील आपल्या संघटनेच्या सदस्यांना पाठविलेल्या संदेशात ही तक्रार म्हणजे खंडणीवसुलीचा प्रकार असून अशावेळी आमच्या सदस्यांच्या पाठीमागे उभे रहाणे हे आमचे कर्तव्य आहे. या प्रकरणात आम्ही आयएमची राज्यस्तरीय समिती आणि न्यायवैद्यक समिती यांनाही निवेदन देणार आहोत, असेही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

SCROLL FOR NEXT