Fake Police Robbery Dainik Gomantak
गोवा

Fake Police Goa: 'हॅलो.. दिल्ली पोलिस बोलतोय'! तोतयाने घातला लाखोंचा गंडा; संशयित गायब; गोवा पोलिसांचा तपास रखडला

Fake Police Salcete: पोलिस असल्याचे भासवून लोकांना लुबाडणाऱ्या तोतया पोलिसाचा थांगपत्ता लावणे अजूनही सासष्टीतील पोलिसांना शक्य झाले नाही, तो सध्या गायब असून पोलिसांचा तपास रखडला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: पोलिस असल्याचे भासवून लोकांना लुबाडणाऱ्या तोतया पोलिसाचा थांगपत्ता लावणे अजूनही सासष्टीतील पोलिसांना शक्य झाले नाही, तो सध्या गायब असून पोलिसांचा तपास रखडला आहे. या तालुक्यात अशा प्रकारच्या दोन घटना या वर्षी घडल्या होत्या, मात्र संशयित अजूनही सापडला नाही.

फसविले गेलेले लोकही आता हतबल झालेले आहेत. संशयितांचा माग लागत नसल्याने सर्वसामान्य नागरिकही भीतीच्या छायेत वावरत आहेत. ११ एप्रिल रोजी कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कार्मोना येथील फुर्तादो दाम्पत्यांना हॅल्लो मी दिल्लीहून पोलिस अधिकारी बोलतो, तुम्ही मनी लॉंड्रींगप्रकरणात आहे.

पोलिस तुमच्या मागावर आहेत. सांगितलेले रक्कम भरा नाही, तर या प्रकरणात अडकवू अशी धमकी देऊन त्यांना साडेचार लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी नंतर फिलोमिना डिकॉस्ता फुर्तादो व एदुआर्दो फुर्तादो यांनी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

हे भामटे हुशार होते. त्यांनी व्हाट्सअँप व्हिडिओ माध्यमातून संशयिताने कॉल केला होता. स्वतःचे नाव दीपेश जोशी असे सांगून या तक्रारदारांना एका इसमाने व्हिडिओ कॉल केला होता. त्यात त्याने आपण दिल्ली पोलिस ठाण्याचा तपास अधिकारी असल्याचे भासविले होते.

फिलोमिना हिच्यावर मनी लॉंड्रींग प्रकरण आहे. गोत्यात येऊ शकते. सिद्देश अजय याच्या बँक खात्यावर रक्कम भर अशी दमदाटी केली होती. घाबरून या तक्रारदाराने रक्कम भरली व नंतर आपण फसविलो गेलो हे त्यांच्या लक्षात आले होते. मागाहून या प्रकरणी कोलवा पोलिसात तक्रार नोंदविली होती.

रोकडसह पोबारा!

दुसरी घटना ७ मे रोजी भर दिवसा शिरली धर्मापुर येथील राष्ट्रीय हमरस्त्यावर घडली होती. मडगाव मासळी मार्केटात मासळी पुरवठा करून परत जात असताना मूळ कारवार- मुर्डेश्वर येथील श्रीधर मोगेर या मासळीवाहू वाहनचालकाला दोन भामट्याने आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून अडविले. नंतर त्याच्याकडील ४ लाख ८३ हजार रोकड पळवून पोबारा केला होता. या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT