Crime Branch
Crime Branch 
गोवा

बनावट दर्यावर्दी रोजगार रॅकेटचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश 

दैनिक गोमन्तक

ओव्हर्ट मरिन या शिपिंग कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ऑनलाईन पद्धतीने दर्यावर्दीच्या नोकरीसाठी प्रक्रिया करून नोकरीचे पत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दर्यावर्दी रोजगार रॅकेटचा क्राईम ब्रान्चच्या सायबर कक्षाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. यासंदर्भातच्या अनेक तक्रारी डीजी शिपिंगकडून आल्या होत्या. या रॅकेटमधील गुवाहाटी येथील सुमित उपाध्याय याला पोलिसांनी अटक केली आहे. 

या बनावट संकेतस्थसंदर्भात तक्रार आल्यावर पोलिसांनी या संकेतस्थळाचा अकाऊंट बंद करत, त्याची सखोल चौकशी सुरू केली असता संशयित सुमित उपाध्याय याच्यापर्यंत पोहचण्यात यश आले. संशयिताने स्वतःची ओळख कोणालाही कळू नये म्हणून वेगवेगळे बनावट अकाऊंट, समिकार्ड तसेच तो गुवाहाटी, दिल्ली तसेच मुंबई अशा ठिकाणी जाऊन जागा बदलत होता. 

संशयित गुवाहाटी येथे असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या सायबर कक्षाच्या पोलिसानी गुवाहाटी पोलिसांशी संपर्क साधला. तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता संशयित गुवाहाटी येथून मुंबईला जाण्यासाठी निघाला असता मुंबई व गुवाहाटी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयित जाळ्यात अडकला. त्याला अटक करून गोव्यात आणले असून पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmikant Parsekar: नाराज लक्ष्मीकांत पार्सेकरांचा अखेर पंतप्रधान मोदींना पाठिंबा, भाजपला फायदा होणार?

Goa Politics: दोन दिवसांवर मतदान! SC, ST नेत्यांचा इंडिया आघाडीला पाठिंबा, भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप

Goa BJP: सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊस्कर यांचा भाऊ संदीप यांच्यासह भाजपात प्रवेश

Goa News : लोकसभा निवडणूक कामगिरीवरून विधानसभेची उमेदवारी गृहीत धरू नये : सदानंद शेट तानावडे

Indian Navy: भारतीय नौदलाला मिळणार हायटेक पाणबुडी, जास्त वेळ पाण्याखाली राहू शकणार; जाणून घ्या काय आहे खास

SCROLL FOR NEXT