High Court Dainik Gomantak
गोवा

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Balram Babu Karishetty Mastermind: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलराम बाबू करीशेट्टी हा सध्या पोलिसांना हुलकावणी देत असून, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळून लावला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलराम बाबू करीशेट्टी हा सध्या पोलिसांना हुलकावणी देत असून, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळून लावला आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून, तो सध्या कर्नाटकात पळून गेल्याची पक्की माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

मायणा-कुडतरी पोलिस त्याच्या मागावर असून, त्याच्यावरील फासे आवळण्यासाठी पोलिसांनी शेजारील राज्यांतील पोलिसांना सतर्क केले आहे. बलराम याने यापूर्वी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो नामंजूर होताच त्याने गोव्यातून धूम ठोकली. त्यानंतर अटक टाळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याने पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत.

२४ मार्च रोजी माकाझन येथील कॅनरा बँकेसमोरून दुपारी बड्डे येथील अशोक कुमार यांचे अपहरण करण्यात आले होते.संशयितांनी त्यांना त्यांच्या ह्युंदाई व्हेन्यू कारमध्ये कोंबून शेजारच्या कर्नाटकातील कारवार येथील एका निर्जनस्थळी नेले आणि त्यांच्याकडील तीन लाख रुपये जबरदस्तीने लुटून पळ काढला होता.

अशोक कुमार यांनी गोव्यात (Goa) आल्यानंतर मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातील अकोला येथील निलेश जाधव याला कर्नाटकातील दावणगिरी येथे अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT