Fake Currency Dainik Gomantak
गोवा

कारवारमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त

कारवारमधील एका संशयितासह मडगावच्या चौघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

दैनिक गोमन्तक

पणजी : कारवार येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलसमोर अंकोला आणि कारवार पोलिसांनी गुरुवारी रात्री संयुक्त कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करत 13 हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अटक केलेल्या चारपैकी तिघे आरोपी मडगाव गोव्याचे रहिवासी असल्याचं आता समोर आलं आहे. (Fake Currency Racket Busted in Karwar)

यावेळी कारवार येथील एका संशयितासह मडगाव -गोवा येथील रहिवासी असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे आहे. मात्र यातील मुख्य आरोपी मुस्ताक हसन बेग हा फरार झाला आहे. अटक केलेल्या चौघांची पोलीस कसून चौकशी करत असून या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी कोडीबाग कारवार येथील प्रवीण नायर (वय.46- हॉटेल कामगार), फातोर्डा- मडगाव येथील लार्सन सिल्वा (26), मडगाव येथील प्रनोय फर्नांडिस, लोयड्स लॉरेन्स स्टेविस यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 26 बनावट नोटा तसेच 40 चलनी नोटांसह एक दुचाकी आणि चारचाकी जप्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुस्ताक हसन बेग हा फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT