Andhra Pradesh Police Dainik Gomantak
गोवा

Andhra Pradesh Police : बनावट नोटा, बंदुकांची तस्करी करणारी टोळी गजाआड; गोव्यातील एकाचा समावेश

आंध्र प्रदेश पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

बनावट नोटा, ड्रग्स आणि बेकायदेशीर बंदुकांची तस्करी करणारी एक आंतरराज्य टोळी आंध्र प्रदेश पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीत गोव्यातील एकाचा समावेश आहे. आंध्र प्रदेश येथील मंगलगिरी अनंतपूर येथील पोलिसांनी ही कारवाई केली. या गोव्यातील युवकाला एका वर्षांपूर्वी ड्रग्स प्रकरणात अटक केली होती.

बनावट नोटा, बंदुकांची तस्करी करणारी टोळीतील पोलिसांनी अटक केलेले संशयित हे तीन बंगळुरू व दोघे मध्य प्रदेश येथील आहेत. या टोळीचा आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोव्यात वावर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बनावट नोटा, ड्रग्स आणि बेकायदेशीर बंदुकांची तस्करी करणारी एक आंतरराज्य टोळी आंध्र प्रदेश पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीत गोव्यात राहणाऱ्या रियाझ शेख याचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. हा रियाझ ड्रग्सच्या धंद्यात असून एका वर्षांपूर्वी त्याला कोकण रेल्वे पोलिसांनी पाच किलो गांजासह अटक केली होती.

आंध्र प्रदेश येथील मंगलगिरी अनंतपूर येथील पोलिसांनी ही कारवाई केली. या टोळीचा आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोव्यात वावर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या टोळीबरोबर पकडला गेलेला रियाझ शेख हा मूळ बेल्लारी येथील असून त्याचे वास्को येथे वास्तव्य होते, अशी माहिती मिळाली आहे. या रियाझ शेख याच्यावर बंगळुरू येथेही गांजा आणि बेकायदेशीर बंदुका विक्री प्रकरणात चार गुन्हे नोंद केले गेले आहेत.

या टोळीतील इतर आरोपींची नावे जमशेद खान, मुबारक, अमीर पाशा (सर्व बंगळुरू), राजपाल सिंग व सुतार आदिवासी (दोघेही मध्य प्रदेश) अशी असून पोलिसांनी त्यांच्याकडून ९ बंदुका आणि मोठ्या प्रमाणावर काडतुसे जप्त केली आहेत. ही टोळी बनावट नोटा छापत होती, तसेच शिरपूर-महाराष्ट्र येथून गांजा खरेदी करून अन्य राज्यात जाऊन तो विकत असे. मध्य प्रदेश येथे एका बनावट बंदुका तयार करण्याच्या कारखान्यातून ते बंदुका खरेदी करून दुसऱ्या राज्यात जाऊन विकत असत, अशीही माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT