bail Dainik Gomantak
गोवा

Goa News: सूत्रधार अल्ताफ येरगट्टी याला दोन वर्षांनंतर मिळाला जामीन

मेथर खूनप्रकरण: उत्तरेत प्रवेशबंदी; न्‍यायालयात उपस्‍थित राहण्‍यास मात्र मुभा

दैनिक गोमन्तक

पणजी: दोन वर्षापूर्वी तोर्डा-पर्वरी येथे घडलेल्‍या विलास मेथर जळीत हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार अल्ताफ यरगट्टी याला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. उत्तर गोव्यात त्याला प्रवेश नाकारताना फक्त सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्यास मुभा दिली आहे. घटनेनंतर दोन वर्षांनी त्याला जामीन मिळाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले असून त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे. विलास मेथर खूनप्रकरणी पोलिसानी सातजणांविरोधात खून व कटकारस्थानच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. संशयित अल्ताफ याने सत्र व उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. तो या खूनप्रकरणातील

प्रमुख सूत्रधार असल्याने त्याला या दोन्ही न्यायालयांनी जामीन नाकारला होता. पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात 71 साक्षीदार असून आरोपपत्र 508 पानांचे आहे. या प्रकरणाचा तपास पर्वरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी केला होता. संशयितांमध्ये अल्ताफ येरगट्टी, सय्‍यद शेख, पवन बडिगर, इक्बाल नानपुरी, संतोष पिल्लई, शैलेश शेट्टी व विश्‍वजीत दाबोळकर यांचा समावेश आहे. सहा संशयितांना जामीन मिळाला होता, मात्र अल्ताफ येरगट्टी याला तो मिळाला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT