Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: गोव्यात 'एक्स्टॉर्शन तुमच्या दारी'; विजय सरदेसाईंचा गोवा सरकारवर घणाघात

खंडणी प्रकरणाची चौकशी व्हायला हवी; तुम्ही म्हटला म्हणून प्रकरण क्लोज कसे होईल

Akshay Nirmale

Vijai Sardesai on Extortion: गोव्यात नुकतेच राज्य सरकारने प्रशासन तुमच्या दारी हा उपक्रम राबवला. त्यावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी जहरी टीका केली आहे.

गोव्यात 'एक्स्टॉर्शन तुमच्या दारी' सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. सरदेसाई यांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून गोवा राज्य सरकारवर टीका केली.

सरदेसाई म्हणाले की, प्रशासन तुमच्या दारी कसले राबवता? राज्यात एक्स्टॉर्शन तुमच्या दारी सुरू झाले आहे. स्वतः सत्ताधारी आमदारच सांगत आहेत की, या खंडणी प्रकरणात डी कंपनीचा हात आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने कोण खंडणी गोळा करत आहे?

स्वतः भाजपचे आमदारच हे सांगत आहेत, विरोधी पक्षातील आमदारांनी हे बोललेले नाही. विरोधक दिशाभूल करत आहेत, असा आरोप केला गेला म्हणून हे सांगितले. आम्ही दिशाभूल करत नाही. तुमचेच आमदार सांगत आहेत खंडणी मागितली जात आहे म्हणून.

खंडणीबाबतचे लेटरही दुसऱ्यांची नावे टाकून पाठवले गेले आहे. भाजप कुणाला वाचवत आहे? भाजप कुणााला क्लीन चीट देऊ इच्छित आहे?कळंगुटचे आमदार मायकल लोबो आता म्हणतात की, खंडणीचा विषय आता संपला आहे.

त्यांनीच हा विषय ओपन केला आणि आता तेच हा विषय क्लोज झाल्याचे सांगत आहेत. हे काहीच कळणारे नाही. असे होऊ शकत नाही. ही लोकशाही आहे. येथे चौकशी झाली पाहिजे.

सरदेसाई म्हणाले की, तक्रार नाही म्हणून पोलिस खंडणी प्रकरणाची चौकशी करायला तयार नाहीत. सु मोटो प्रमाणे स्वतः दखल घ्यायला काय होते. जेव्हा खुद्द आमदार, माजी आमदार खंडणीची तक्रार करत आहेत, त्यावेळी त्याची दखल घ्यायला नको?

आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत. जबाबदार व्यक्ती आहेत. कुणीही रस्त्यावरील उठून आरोप केलेला नाही. आमदारांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायला नको? खंडणी प्रकरणाची चौकशी का होत नाही? हाच आमचा सवाल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT