High Blood Pressure Causes
High Blood Pressure Causes Dainik Gomantak
गोवा

Causes High Blood Pressure: तज्ज्ञ म्हणतात तणावामुळेच जडतो उच्च रक्तदाबाचा विकार

दैनिक गोमन्तक

धीरज हरमलकर

सध्याच्या वेगवान जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीवर जास्त ताण येतो. या तणावामुळे आजकाल बहुतेक लोक (हाय बीपी) उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. रक्तदाब वाढल्याचे कोणतेही विशिष्ट लक्षण नाही.

तुम्हाला काहीही शारीरिक चिन्ह न जाणवता तुमचा रक्तदाब दीर्घकाळ वाढलेला राहू शकतो. जो अचानक येणाऱ्या अर्धांगवायूच्या रूपाने पुढे येऊ शकतो,असे मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.रुपेश पाटकर यांनी सांगितले. (High Blood Pressure Causes)

आरोग्य तज्ज्ञांचा दावा आहे, की धकाधकीची जीवनशैली आणि अनाठायी सवयींमुळे व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब वाढू शकतो, प्रसंगी हृदयाच्या विफलतेमुळे मृत्यूही ओढवू शकतो.

हे जरी खरे असले तरी, काही बाबींचे पालन केल्यास आपण उच्च रक्तदाब दूर ठेवू शकतो. १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो.

जंकफूड टाळा; हिरव्या भाज्या खा !

प्रियोष्का डायट क्लिनिकच्या प्रिओष्का रॉड्रिग्स, म्हणाल्या की, ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी उच्च उष्मांक असलेले, पॅकेज केलेले खाद्य आणि जंकफूड टाळावे. कारण जास्त उष्मांक असलेले जंकफूड शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. हिरव्या पालेभाज्या आणि जास्त फायबर असलेले घरगुती अन्न घेणे चांगले. दिवसातून ३० मिनिटे नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि मीठ माफक घ्यावे.

हृदयाला जादा मेहनत घ्यावी लागते

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिगंबर नाईक, यांनी सांगितले, की उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. यामुळे खालच्या डाव्या हृदयाचा कक्ष (डावा वेंट्रिकल) घट्ट होतो.

यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होते आणि अचानक मृत्यूचा धोका बळावतो. हायबीपीमुळे आपण पाणी आणि मीठ सोडतो. मीठ अगदीच कमी केले, तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असेही ते म्हणाले.

दुर्लक्ष केल्यास...

  • सततचा रक्तदाब मेंदूतील शीर फुटून अर्धांगवायूला कारण ठरू शकतो.

  • दीर्घकाळचा रक्तदाब हृदयविकारालाही कारण ठरू शकतो. 

  • उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडावर दुष्परिणाम घडवू शकतो.

  • डोळ्यातील रेटीनावर दुष्परिणाम घडवू शकतो.

रक्तदाब म्हणजे काय ?

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर म्हणाले,की रक्तदाब म्हणजे हृदयाकडून शरीराच्या विविध भागांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधील दाब.  १२०/८० mm Hg.

यातील पहिला आकडा हा हृदय आकुंचन पावते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये असलेला दाबाचा असतो. ज्याला सिस्टोलिक ब्लडप्रेशर म्हणतात. दुसरा आकडा हा हृदय जेव्हा प्रसरण पावते तेव्हाच्या रक्तदाबाचा असतो. त्याला डायास्टोलिक ब्लडप्रेशर म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT