Goa Eco Sensitive Zone Dainik Gomantak
गोवा

Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

Mhaus Panchayat: परिसरातील अनेक गावे शेती, बागायतीवर अवलंबून आहेत त्यामुळेअतिसंवेदनशील क्षेत्र झाल्यास तेथे जाणे-येणे कठीण होईल असा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Mhaus Gramsabha

वाळपई: म्हाऊस पंचायतीमधील गावे अतिसंवेदनशील प्रस्तावमुळे संकटात आली असून अतिसंवेदनशील क्षेत्र मंजूर झाले तर आम्ही करायचे काय? हा प्रश्‍न आहे. आमचा या प्रस्तावाला विरोध असून ही गावे वगळावी, अशी माऊसच्या खास ग्रामसभेत मागणी करण्यात आली.

यावेळी सरपंच सुलभा देसाई, उपसरपंच राधीका सावंत, पंच कांता गावस, प्रिती गावकर, गुरुदास गावस, पंचायत सचिव संदीप हल्याळी तसेच इतर ग्रामस्थांची उपस्थित होते

यावेळी पंचायत सचिव संदिप हल्याळी यांनी उपस्थितांसमोर अति संवेदनशीलविषयी विषय मांडला. त्यात सविस्तर चर्चा करुन ठराव घेण्यात आला.

सरपंच सुलभा देसाई म्हणाल्या, दाबे, म्हाऊस, झर्मे, नागवे कोपार्डे गावांचा समावेश झाल्यास येथील शेतीवर परिणाम होईल. ही गावे जर अतिसंवेदनशील क्षेत्रात गणली गेली, तर आमच्यावर मोठे संकट येणार आहे. यासाठी आमचा या प्रस्तावाला विरोध असून सरकारने आमची सर्व गावे अतिसंवेदनशील क्षेत्रामधून वगळावी. माऊस परिसरातील अनेक गावे या परिसरातील शेती, बागायतीवर अवलंबून आहेत. अतिसंवेदनशील क्षेत्रात ही गावे आल्यास तेथे जाणे-येणे कठीण होईल. रोजच्या जगण्यावरच निर्बंध येतील, त्यासाठी ही गावे वगळावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT