Goa Forward Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: मोफत सिलिंडर न देता मंत्रालयावर 10 कोटींचा अतिरेकी खर्च म्हणजे महिलांचा अपमान

गोवा फॉरवर्डचा आरोप: गोव्यातील तमाम महिलावर्गाचा अपमान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयाच्या (मंत्रालय) अवास्तव नूतनीकरणावर सुमारे 10 कोटी रुपये खर्चाबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. अश्मा सय्यद यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून हा अतिरेकी खर्च म्हणजे गोव्यातील महिलांचा अपमान करण्यासारखे आहे.

विशेषत: जेव्हा भाजप सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असे सरकार म्हणत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अवाजवी खर्च अधिकच डोळ्यात खुपतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

गोव्यातील कित्येक कुटुंबे वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींशी झगडत असताना, आपल्या समाजातील या गरीब आणि उपेक्षित घटकांच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी गोवा सरकार, मुख्यमंत्री आणि भाजपच्या अहंकारी इच्छांना प्राधान्य देत आहे.

हे पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. मुख्यमंत्री कार्यालयावरील हा फालतू खर्च ही हास्यास्पद गोष्ट आहे, गोव्यातील महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या वास्तविकतेबद्दलच्या आकलनाचा मुख्यमंत्री सावंत यांच्यामध्ये तीव्र अभाव दिसून येतो, हे त्यातून स्पष्ट होत आहे, असे सय्यद म्हणाल्या.

विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक निधीचे वाटप केले जावे. गोव्यातील महिलांसाठी तीन मोफत गॅस सिलिंडरमुळे त्यांचा आर्थिक भार कमी व्हायला हवा होता आणि त्यांचे कल्याण व्हायला हवे होते.

मात्र, मुख्यमंत्री त्यांच्याबाबत असंवेदनशील आहेत. त्यांच्या कृतीतून चुकीच्या स्थानावर असलेल्या प्राधान्यक्रमांची आणि महत्त्वाच्या सामाजिक कल्याण उपक्रमांबद्दलच्या वचनबद्धतेच्या अभावाची ग्वाही दिसून येते, असेही त्या पुढे म्हणाल्या.

कल्याणकारी योजना राबवा

समाजाचा कणा असलेल्या गोव्यातील महिलांच्या अनेक अत्यावश्यक गरजा अपूर्ण राहिल्या असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कार्यालयाचे भव्य नूतनीकरण करावे, हे आम्हांला मान्य नाही.

त्यांनी गोव्यातील महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. अशा व्यर्थ खर्चाला आळा घालून तो पैसा कल्याणकारी योजना अमलात आणण्यासाठी वापरावा, असेही सय्यद म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT