Road Work Dainik Gomantak
गोवा

Panaji News : सांताक्रुझमध्ये खोदाई; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

धुळीमुळे लोक हैराण : लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

सांताक्रुझमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांसाठी रस्ते खोदण्यात आले व वाहिनीचे कामही पूर्ण होऊन सहा महिने उलटत आले तरी या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे या परिसरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे. या खोदकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहन चालकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी त्याचे डांबरीकरण झाले नाही, तर या रस्त्यावर पाणी साचून लोकांना चालणेही मुष्किलीचे होणार आहे. त्यामुळे आमदारांनी लक्ष घालून होणाऱ्या समस्येवर तोडगा काढावा,अशी मागणी होत आहे.

या भागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते, त्यावर माती घालण्यात आली आहे. त्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी खचले आहेत. वाहन चालक डांबरीकरणाच्या रस्त्यावरच वाहन चालवताना एकमेकांना साईड देताना मोठी तारांबळ उडत आहे. त्यातून दुचाकीस्वारांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते.

पावसाळा जवळ आल्याने येथील स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना या मातीच्या धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांनी या रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत कोणतीच दखल घेतली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT