Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

निसर्ग संवर्धनात प्रत्येकाने वाटा उचलावा

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आर्लेकर : ठाणेतील पदभ्रमण मोहिमेत सहभाग

दैनिक गोमन्तक

वाळपई : गोवेकरांची जीवनशैली झपाट्याने बदलू लागलेली आहे. तरीसुद्धा गोवेकरांनी आपली संस्कृती व स्वभाव टिकून ठेवलेला आहे. त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

ठाणे - सत्तरी येथे आयोजित कार्यक्रमात ते पुढे म्हणाले, की सुमारे ४ कोटी खर्चून हिमाचल प्रदेशमध्ये कायमस्वरूपी पदभ्रमण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पदभ्रमण मोहीम आयोजित करून त्या भागातील नैसर्गिक सौंदर्याला वाव देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे.

ठाणे - सत्तरी पंचायत सभागृहात आयोजित या कार्यक्रमास ऑल इंडिया युथ हॉस्टेलच्या गोवा शाखेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, सचिव मनोज जोशी, पंचायतीचे प्रशासक अझीझ शहा, सचिव विनायक गावकर, सचिव सर्वेश गावकर पंचायतीचे माजी उपसरपंच गोविंद कोरगावकर उपस्थित होते.

मनोज जोशी यांनी या पदभ्रमण मोहिमेसाठी आमदार दिव्या राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.

पुढील मोहीम महावीर अभयारण्यात : गेल्या दहा वर्षांपासून पदभ्रमण मोहीम आणि शिबिरे सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत. यंदा याला अतिशय चांगला लाभला असून 600 नागरिक सहभागी झाले आहेत‌. येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे हिवाळी पदभ्रमण मोहीम भगवान महावीर अभयारण्यात होणार असल्याचे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT