Goa Women's Safety  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात प्रत्येक तालुक्यात महिलांच्या सुरक्षेसाठी संपर्क केंद्र उभारावी: बायलांचो साद

गोवा नेटवर्क फॉर जेंडर जस्टिसच्या घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी संपर्क केंद्र उभारणीची मागणी 'बायलांचो साद'तर्फे करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा नेटवर्क फॉर जेंडर जस्टिसच्या घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी संपर्क केंद्र उभारणीची मागणी 'बायलांचो साद'तर्फे करण्यात आली. प्रत्येक केंद्रात स्वतंत्र प्रभार असलेले संरक्षण अधिकारी असावेत आणि त्यांना पुरेशा पायाभूत सुविधा, बजेट आणि संवेदनशील कर्मचार्‍यांसह सुसज्ज असावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महिलांवरील गुन्ह्यांचे गंभीर निवारण करण्याच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिला संघटनेने राज्य आणि केंद्राच्या मंत्र्यांना आवाहन केले आहे.

यामध्ये प्रत्येक तालुक्‍यात संपर्क कार्यालयांसह स्वतंत्र प्रभार असलेल्या संरक्षण अधिकार्‍यांची नियुक्ती आणि गोवा राज्य महिला आयोगासाठी अध्यक्षपदाची नियुक्ती करणे या मागण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे.

“व्यक्तींची नियुक्ती न झाल्याने आणि पुरेसे बजेट नसल्यामुळे गोवा राज्य महिला आयोग आपले कर्तव्य पार पाडू शकत नाही. अनेक महिला निराश होऊन परतल्या कारण त्यांच्या प्रकरणांची आयोगाने तातडीने दखल घेतली नाही,” असे संयोजक सबिना मार्टिन्स यांनी सांगितले.

महिला संघटनेने गुणात्मक कामासाठी महिलांवरील गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी पायाभूत सुविधांसह पुरेशा बजेटची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT