Establishment of Blue Cap Prepaid Taxi Association Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: ब्ल्यू कॅप प्रीपेड टॅक्सी संघटनेची स्थापन...

अध्यक्षपदी संजय कांबळी : 200 सदस्यांची नोंदणी करणार

Shreya Dewalkar

मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना थांबा मिळावा यासाठी गेले सहा महिन्यांपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू होते. अखेर या टॅक्सी व्यावसायिकांसाठी या विमानतळावर ब्ल्यू कॅप प्रीपेड टॅक्सी काउंटर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यासाठी या व्यावसायिकांना संघटन स्थापन करून सरकार दफ्तरी नोंदणी करणे आवश्‍यक होते. त्यानुसार ब्ल्यू कॅप प्रीपेड टॅक्सी असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी संजय कांबळी याची निवड केली आहे.

अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे, उपाध्यक्षपदी राजन नाईक, सचिव रामचंद्र गावडे, सहसचिव नंदकुमार मालवणकर, खजिनदार सुवेक गावस, सहखजिनदार महेश प्रभुदेसाई, सभासद सिद्धेश नारुलकर, गुरुदास महाले, राजेश मयेकर, बाबू वरक, निखिल महाले, सिद्धेश नारुलकर, गजानन गडेकर, बुधाजी शेटकर, सिद्धेश महाले व रूपेश कांबळे यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत १५ जणांचा समावेश आहे.

सुरूवातील सरकारने परमीट ग्राह्य धरलेले २०० टॅक्सी व्यावसायिकांना सदस्य म्हणून सामावून घेण्यात येणार आहे. व्यवसाय सुरळीत चालल्यास पेडण्यातील आणखी सुमारे १०० टॅक्सी व्यावसायिकांना यात सामवून घेण्यात येईल, असे टॅक्सी व्यवसाय संघटनेचे नेते भास्कर नारुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळी, उपाध्यक्ष राजन नाईक, सेक्रेटरी रामचंद्र गावडे, सहसचिव नंदकुमार मालवणकर, खजिनदार सुवेक गवस, सह खजिनदार महेश प्रभुदेसाई तसेच इतर सभासद उपस्थित होते.

समस्या सोडवण्यास मदत

संघटनेचे नेते भास्कर नारुलकर यांनी सांगितले की, विमानतळावर रोजगाराची संधी मिळावी यासाठी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी गेले अनेक महिने आंदोलन केले. आमदार प्रवीण आर्लेकर, वाहतूक अधिकारी, वाहतूकमंत्री व मुख्यमंत्री तसेच टॅक्सी असोसिएशनचे नेते सुदीप ताम्हणकर, उदय महाले, ॲड. प्रसाद शहापूरकर, जितेंद्र गावकर आदींनी सहकार्य केल्याने तसेच पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी एकजूट दाखवल्याने प्रीपेड टॅक्सी काउंटर सुरू झाला आहे. संघटन स्थापन झाल्याने त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

दोन हजार भरा, सदस्य व्हा

संघटनेचे अध्यक्ष संजय नामदेव कांबळी यांनी सांगितले की, पेडण्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सध्या या संघटनेच्या माध्यमातून दोनशे सदस्यांना प्रीपेड टॅक्सी काउंटरवर समाविष्ट करण्यात येईल. त्यासाठी दोन हजार रुपये शुल्क भरून कायमस्वरूपी सभासद व्हावे लागणार आहे. वाहतूक खात्याने निर्देश दिलेल्यानुसार आपले वाहन ब्ल्यू करून घ्यावे लागणार आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास हा टॅक्सी काउंटर लवकर सुरू होण्यास मदत होईल,असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT