Badminton  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सुशोभिकरणासह 'बॅडमिंटन' कोर्टची उभारणी

फर्मागुढीत बदल: फोंडा वाहतूक पोलिसांचे असेही उल्लेखनीय कार्य..!

दैनिक गोमन्तक

फोंडा: वाहतूक पोलिस म्हटल्यावर केवळ तालांव देणारा पोलिस समोर दिसतो. मात्र वाहतूक पोलिस म्हणजे केवळ तालाव देणारे आणि नियमांवर बोट ठेवून चालणारे पोलिस नव्हेत तर कक्षेबाहेर जाऊन परिसराचे सुशोभिकरण आणि मुख्य म्हणजे पोलिसांच्या आरोग्याप्रती सजगता बाळगणारे ‘जिंदादिल’ रक्षक तर आहेच, पण समाजाप्रती योगदान दिलेल्या ज्येष्ठांचा आदर करणारे एक ‘माणूस'' असल्याचे फोंड्यातील वाहतूक पोलिसांनी दाखवून दिले आहे.

फर्मागुढी - फोंडा येथे पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिसांनी पोलिस वास्तूसमोर वृक्षारोपण करून सौंदर्यीकरण करण्याबरोबरच पोलिसांना व्यायाम व्हावा यासाठी बॅडमिंटन कोर्ट उभारला आहे. ज्या जागेवर पूर्वी भंगारातील वाहने टाकण्यात आली होती, तेथे आता स्वच्छतेबरोबरच परिसर सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला आहे. मन प्रसन्न करणारे वातावरण निर्मितीसाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. अल्पावधीत उभारलेल्या या बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील व धर्मेश आंगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रवी देसाई, फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर व इतर पोलिस उपस्थित होते.

सी. एल. पाटील यांनी रवी देसाई व त्यांच्या सहकारी पोलिसांचे कौतुक करून पोलिस म्हणजे केवळ हाती दंडुका घेऊन उभे राहणारे नव्हे तर त्यांच्यातही माणुसकी आहे, त्यांनाही चांगल्याची आवड आहे, हे वाहतूक पोलिसांनी दाखवून दिल्याचे नमूद केले. काही पोलिसांमुळे खात्याची बदनामी होत असली तरी सर्वच पोलिस वाईट आहे, असे समजू नका, त्यांच्यातही माणुसकी आहे, हे जाणून घ्या, असे पाटील यांनी सांगितले. धर्मेश आंगले यांनीही वाहतूक पोलिसांचे कौतुक करताना अशाप्रकारची सामाजिक बांधिलकी प्रत्येकजणाने दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात पोलिसांना बॅडमिंटन कोर्ट तसेच वृक्षारोपणात सहकार्य केलेल्या सर्वांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक डॉ. अनील गावणेकर, डॉ. प्रदीप नगर्सेकर, आर्किटेक्ट गिरिश केळेकर यांच्याबरोबरच पोलिसांना बरिकेडस् प्रदान केलेले अवधुत रायकर व इतरांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन महेश सांगोडकर यांनी केले तर रवी देसाई यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT