Curti-Khandepar Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार पंचायतीत रंगला संगीत खुर्चीचा खेळ; विल्मा फर्नांडिस यांच्या बाबतच्या चर्चांना उधान!

Former Deputy Sarpanch Wilma Fernandes: एका मोठ्या नाट्यानंतर पायउतार झालेल्या कुर्टी- खांडेपार पंचायतीच्या माजी उपसरपंच विल्मा फेर्नांडिस यांच्या बाबतची चर्चा या भागात सध्या जोरात सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

एका मोठ्या नाट्यानंतर पायउतार झालेल्या कुर्टी- खांडेपार पंचायतीच्या माजी उपसरपंच विल्मा फेर्नांडिस यांच्या बाबतची चर्चा या भागात सध्या जोरात सुरू आहे. उपसरपंच असलेल्या विल्मा यांच्यावर पंचायतीच्या सहा पंचांनी अविश्वास ठराव दाखल केला असला तरी तत्पूर्वीच आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचा दावा त्या करत होत्या.

पण हे राजीनामा पत्र न मिळाल्यामुळे पंचायतीच्या सचिवानी या अविश्वास ठरावावर चर्चा करण्याकरता १६ ऑगस्ट रोजी पंचांची एक खास बैठक बोलवली होती. पण बैठक सुरू व्हायला अर्धा तास असतानाच पंचायतीच्या सरपंचांनी विल्माचे राजीनामा पत्र सादर केल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली होती.

सदर पत्र अकरा दिवस आधी देऊनसुद्धा ऐनवेळी सादर करण्याचे प्रयोजन काय यावर या पंचायतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विल्मा या या पंचायतीतील काँग्रेसच्या एकमेव पंच असल्यामुळे या प्रयोजनाला वेगवेगळे कंगोरे लावले जात आहेत. सुरुवातीला भाजपकडे ११ पैकी पाचच पंच असल्यामुळे त्यांना काँग्रेसच्या विल्मा यांचा आधार घ्यावा लागला होता. पण नंतर झालेल्या एका घडामोडीत डॉ. केतन भाटीकर यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या निळकंठ नाईक यांनी भाजपमध्ये उडी घेतल्यामुळे समीकरणे बदलली होती.

याचीच परिणीती विल्माच्या पायउतार होण्यात झाली आहे. आता उपसरपंचा पाठोपाठ आपली ‘टर्म’'' संपल्यामुळे सरपंचही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पंचायतीला आता सरपंच व उपसरपंच असे दोन नवे चेहरे मिळणार आहे. सध्याचे सरपंच हरेष नाईक हे गेल्या दोन वर्षातील तिसरे सरपंच असून उरलेल्या तीन वर्षात या पंचायतीला आणखी किती सरपंच मिळतात, हे बघावे लागेल.

गेल्या खेपेला आठ पंचानी या पंचायतीचे सरपंच पद भूषवले होते. सरपंच कृषिमंत्री यांचे समर्थक असल्यामुळे त्यांचा कार्यकाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.पण सध्या फोंड्यात भाजपचे दोन गट झाले असून त्याची पाळेमुळे आता पालिकेप्रमाणेच फोंडा मतदारसंघातील या एकमेव पंचायतीतही पसरायला सुरुवात झाली आहे.

दळवी गट सक्रीय!

फोंडा पालिकेचे नगरसेवक विश्वनाथ दळवी हे आपली रणनीती आखताना दिसत असून ठरल्याप्रमाणे सध्याचे सरपंच पायउतार झाल्यास दळवींच्या गटातील अभिजित गावडे यांची वर्णी लागू शकते. पण या संगीत खुर्चीमुळे पंचायतीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे याचे सोयरसुतक मात्र कोणालाच पडलेले दिसत नाही. आगामी काळात या हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आतापासूनच दिसायला लागली आहे, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT