Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या एस्कॉर्ट रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिला अटकेत

Goa Crime News: मुंबईला पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या या दोन्ही महिलांना पर्वरी पोलिसांनी अटक केली.

Pramod Yadav

Goa Crime News

पर्वरी: एस्कॉर्ट मुली पुरवण्याच्या नावाखाली पर्यटकांची लुबाडणूक आणि खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी मुंबई आणि पश्चिम बंगाल येथील दोन महिलांना अटक केली आहे. याप्रकरणी कांदोळी येथील एका टॅक्सी चालकाला देखील अटक करण्यात आलीय.

बबिता रमेश उपाध्याय (२८ रा. मुंबई) आणि सुतापा बॅनर्जी (३८, रा. पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत. मुंबईला पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या या दोन्ही महिलांना पर्वरी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी सागर नईम अन्सारी (२७, लुधियाना, पंजाब) यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अन्सारी यांच्यासह त्यांच्या मित्राला हॉटेलमध्ये मारहाण करुन २० हजार रुपये लुटल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती.

पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) आणि ३(५) गुन्हा नोंद करत, दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन महिलांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अटक महिला पुरुष पर्यटकांना एस्कॉर्ट मुली पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होत्या. पर्यटकांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळत होत्या. याप्रकरणी तक्रार समोर येताच पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण शिरोडकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

SCROLL FOR NEXT