Gajanan Shetye Dainik Gomantak
गोवा

Gajanan Shetye: पर्यावरणासाठी झपाटलेला तरुण, गजानन शेट्ये यांना 'बडींग नॅचरलीस्ट अवॉर्ड'चा बहुमान

Spices And Habitats Warriors Awards 2025: सत्तरी तालुक्यातील गजानन शेट्ये हे अशाच झपाटलेल्या पर्यावरणवादींपैकी एक आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन येत्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या होणाऱ्या 'स्पिसेस अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स-२०२५' या सोहळ्यात त्यांना 'बडींग नॅचरलीस्ट अवॉर्ड' देऊन गौरव करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यावरण आणि त्याचे जतन हा आजच्या काळातील एक कळीचा मुद्दा बनला आहे. नाजूक अवस्थेत असलेल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम उत्पन्न करण्यासाठी आज अनेक पर्यावरणवादी एखाद्या सैनिकासारखेचच तन-मनाने झटत आहेत. सत्तरी तालुक्यातील गजानन शेट्ये हे अशाच झपाटलेल्या पर्यावरणवादींपैकी एक आहेत.

त्यांच्या कामाची दखल घेऊन येत्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या होणाऱ्या 'स्पिसेस अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स-२०२५' या सोहळ्यात त्यांना 'बडींग नॅचरलीस्ट अवॉर्ड' देऊन गौरव करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 5 जून या दिवशी सायंकाळी सहा वाजता शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 

इयत्ता पाचवीत असताना पर्यावरणासंबंधात कार्य करणाऱ्या विवेकानंद पर्यावरण जागृती ब्रिगेड या संस्थेच्या एका कार्यशाळेत गजानन यांनी भाग घेतला होता आणि तेव्हापासून त्यांच्या पर्यावरण प्रेम-प्रवासाला सुरुवात झाली. आज तर ते स्वतःच विवेकानंद पर्यावरण जागृती ब्रिगेडचे कार्यकारी सदस्य आहेत. पर्यावरण (Environment) जागृती संबंधातील कामाबरोबरच वन्यजीव छायाचित्रकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनेक चळवळींची त्यांचा संबंध आला आहे. पश्चिम घाटातील तसेच गोव्याच्या अन्य भागातील वन्यजीव जतन, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संबंधातील फिल्डवर्क बरोबरच पर्यावरण शिक्षण आणि सामुदायिक कार्य यातील त्यांच्या नेतृत्वगुणांची पारख झाली आहे. 

वन्यजीव छायाचित्रण आणि निसर्ग संवर्धन याबाबतीत त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना यापूर्वी धनेश्वर पुरस्कार प्राप्त झाला आहे. एका सांबर हरणाला वाचवण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल आणि केलेल्या जलद कारवाईबद्दल वन अधिकारी परेश पोरोब यांनी त्यांचा, 'तुमची ही कृती इतर गावकऱ्यांमध्ये आदर्श निर्माण करील आणि दीर्घकाळ ओळखली जाईल' या शब्दात सन्मान केला आहे. 

इतिहास आणि समाजशास्त्र हा विषय घेऊन जरी गजानन यांनी पदवी प्राप्त केलेली असली तरी आता ते पूर्णवेळ पर्यावरण क्षेत्रातच काम करत आहेत. 'हरित धरोहर' या त्यांच्या स्वतःच्या आस्थापनातून आता त्यांचे मार्गदर्शन चालते. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटक (Tourists) यांना घेता येणे शक्य आहे. पर्यावरणाच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर काम  करण्याची त्यांची इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT