MLA Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Environment Minister Alex Sequeira: सांडपाण्याचा प्रश्न सोडविणार; पर्यावरणमंत्री सिक्वेरा

MLA Alex Sequeira: नागरिकांची ऐकून घेतली गाऱ्हाणी

दैनिक गोमन्तक

MLA Alex Sequeira: पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीतील सभागृहात खास बैठक बोलावली होती. या बैठकीत सासष्टीतील लोटली, कांसावली, कोलवा, नुवे या भागातील लोकांनी हजेरी लावून आपापल्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या.

शॅकमालक असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी शॅकमधील सांडपाणी उचलण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मंत्र्यांकडे मागणी केली. त्यावेळी हे काम एजन्सीकडे सोपविण्याचा सरकारचा विचार आहे.

एजन्सीचा प्रतिनिधी सर्व किनाऱ्यावरील शॅकचे सर्वेक्षण करेल व त्यानुसार आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेणार आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

शॅक सुरू झाल्यास तीन महिने झाले. मात्र, आम्हाला नुकसानीत व्यवसाय करावा लागत आहे. अजून म्हणावे तितके पर्यटक येत नाहीत, अशी कैफियतही कार्दोज यांनी मांडली.

शॅकची सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी आम्हाला तातडीच्या पर्यायाची गरज आहे. आम्ही एका एजन्सीकडे हे काम सोपविणार आहे. तो सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करील. आमची पुढील बैठक 20 डिसेंबरला होणार आहे. त्यात निर्णय घेतला जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.

पे-पार्किंगचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

पे पार्किंगबद्दल सिक्वेरा म्हणाले, की आपण याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून ते या विषयावर योग्य तो निर्णय घेतील. लोकांच्या समस्यांची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. पे पार्किंगची निविदा जाहीर केली आहे. कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यास थोडा वेळ लागेल. आपल्या मते गोमंतकीय वाहनांना पे पार्किंगचे शुल्क लागू करू नये अशा मताचा आपण असल्याचेही मंत्री सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT