Nandadeep Raut Dainik Gomantak
गोवा

आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार: नंदादीप राऊत

नंदादीप यांच्यासाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत(Nandadeep Raut) 30 रोजी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुरगाव पालिका निवडणुकीपासून (Election) ते भाजपवर (BJP) नाराज होते. वास्को विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे उमेदवार असू शकतात.

शुक्रवारी नंदादीप राऊत यांचा वाढदिवस होता. त्याचे औचित्यसाधून आपण पुढच्या आठवड्यात काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती पत्रकारांना दिली. माझ्याबरोबर माझे दीड हजार समर्थक काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले. नंदादीप एकेकाळी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे जवळचे समर्थक होते. मात्र नुकत्याच झालेल्या मुरगाव पालिका निवडणुकीत नंदादीप व कार्लुस यांच्यात दुरावा निर्माण झाला.

पालिका निवडणुकीवेळीच त्यांनी सत्ताधारी भाजपच्या गटात येण्यास नकार दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रयत्न करूनही राऊत यांनी त्यावेळी फारशी दाद दिली नव्हती. त्यामुळे राऊत आपला वेगळा मार्ग निवडणार हे स्पष्ट झाले होते. अखेर त्यांनी आपण 30 रोजी काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश करणार, असे काल त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केले.

मुरगाव पालिकेच्या प्रभाग 15 चे नगरसेवक (Corporator) म्हणून ते निवडून आले होते. 18 महिने त्यांना वास्कोचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधीही मिळाली होती. त्या दरम्यान त्यांनी अनेक विकास कामे केली. सडा येथे वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या कचऱ्यावर त्यांनी प्रक्रिया केली. सध्या गाजत असलेल्या मासळी बाजाराचे स्थलांतरणाचा विषय त्यांच्याच कार्यकाळात झाले. पालिका बाजार इमारतीचे काम त्यांनी सुरू केले.

दोन महिने ते हितचिंतक, समर्थक यांच्याशी चर्चा करत होते. अनेक बैठकांचे आयोजन त्यांनी केले. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे पटले की, आता नंदादीप यांच्यासाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. त्यांच्याकडे अनेक पक्षांनी संपर्क साधला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT