Goa land ,Environment Protection Dainiak Gomantak
गोवा

जमीन वाचवा, गोवा वाचवा! पर्यावरणासाठी 'इनफ इज इनफ'चा एल्गार; राष्ट्रपतींच्या सूचनेनंतरही राज्य सरकार गप्प का? कुएल्हो यांचा सवाल

Goa land ,Environment Protection: उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांच्या ‘इनफ इज इनफ’ या चळवळीतर्फे तालुकास्‍तरीय बैठका घेण्‍यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांच्या ‘इनफ इज इनफ’ या चळवळीतर्फे तालुकास्‍तरीय बैठका घेण्‍यात येणार आहेत. गोव्‍यातील जमिनी व पर्यावरण रक्षणासाठी ही हाक देण्‍यात आली आहे. संघटनेचे उत्तर गोवा प्रभारी प्रेमानंद दिवकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फ्रान्सिस कुएल्हो, देविदास आमोणकर उपस्थित होते.

बार्देश तालुक्यातीलनागरिकांसाठी कांदोळी येथे १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता साल नोस्सा सिन्होरा कॅपेलमध्ये बैठक होणार असल्याची माहिती दिवकर यांनी दिली. ते म्‍हणाले, गोव्याची सध्याची स्थिती बिकट असून राज्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पुढील पिढ्यांसाठी गोवा टिकवून ठेवण्यासाठी जमिनींचे संरक्षण आवश्यक असल्याने ‘इनफ इज इनफ’ चळवळ सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींकडून निवेदनाची दखल

न्‍या. फर्दिन रिबेलो यांनी पाठविलेल्या निवेदनाची दखल राष्ट्रपतींनी घेतली असून राज्य सरकारच्या संबंधित खात्यांना कार्यवाहीसाठी सूचना केल्या आहेत. मात्र पंतप्रधान व राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही, असे कुएल्हो यांनी स्पष्ट केले.

बार्देशमधील बैठकीपूर्वी ९ तारखेला डिचोली येथेही बैठक घेण्याचे नियोजन आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज मैदान अद्याप उपलब्ध झालेले नाही. सत्तरी व तिसवाडी तालुक्यातही सभा आयोजित करण्यात येणार आहेत. कलाकार व स्वयंसेवी संस्थांशी न्या. रिबेलो संवाद साधतील.

- फ्रान्सिस कुएल्हो, कार्यकर्ते (इनफ इज इनफ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT