Yuri Alemao | Goa News Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : विधवा भेदभाव प्रथा तातडीने बंद करा; युरींचे खासगी ठराव

दैनिक गोमन्तक डिजिटल

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आगामी विधानसभा अधिवेशन कामकाजात दाखल करून घेण्यासाठी दोन खासगी ठराव मांडले आहेत. पहिला ठराव विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा थांबवणे आणि अंत्यसंस्कांरावेळी मृत स्त्री-पुरुषांचे कपडे न काढणे.

तर, दुसरा ठराव राज्‍यात अलीकडे लागलेल्‍या आगीच्या घटनांची सखोल चौकशी करणे तसेच भूस्खलन आणि किनारपट्टीवरील मातीची धूप यावर अभ्यास करण्याची मागणी करणारा. हे दोन्ही ठराव अधिवेशन कामकाजात सूचिबद्ध झाल्यास शुक्रवार दि. 31 मार्च रोजी चर्चेसाठी येणार आहेत.

विधवा भेदभाव, विधवा अत्याचार आणि विधवा विलगीकरण या अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. विधवा भेदभाव आणि गैरवर्तन हे प्रकार परंपरा, धार्मिक किंवा सामाजिक प्रथेचा भाग म्हणून गृहित धरले जातात. त्याविरोधात सहसा तक्रार नोंदविली जात नाही, असे आलेमाव यांनी आपल्या ठरावात म्‍हटले आहे.

राज्‍यातील काही पंचायतींनी अशा कालबाह्य आणि अमानवी प्रथांच्या विरोधात ठराव घेतले आहेत आणि विधवेला विवाहित स्त्रीच्या बरोबरीने वागणूक दिली पाहिजे अशी मागणी केली आहे.

पंचायत संचालनालय, नगरपालिका संचालनालय, गोवा राज्य महिला आयोग आणि गोवा मानवाधिकार आयोग यांच्या समन्वयाने पंचायतींच्या ग्रामसभा तसेच प्रत्येक शहरात जनजागृती सभा घेऊन विधवांना समान वागणूक देण्यासंबंधी जागृती निर्माण करावी.

तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजातील अप्रचलित, पुरातन प्रथा आणि मानसिकतेविरुद्ध लोकांमध्ये जागृती तयार करावी. अशा सर्व अन्यायकारक प्रथांना आळा घालण्यासाठी सरकारने कायदा आणण्याचा विचार करावा असेही आलेमाव यांनी नमूद केले आहे.

आग : चौकशीसाठी आयोग स्‍थापा; अधिवेशनात मांडणार मुद्दा

म्हादई अभयारण्य, इको सेन्सिटिव्ह झोन, टेकड्या, जंगले तसेच गोव्यातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रे, औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी अलीकडच्या काळात लागलेल्या आगीच्या घटनांची चौकशी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसह उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली उच्चस्तरीय चौकशी आयोग तातडीने स्थापन करण्याची मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

गोव्यातील दोन्ही जिल्हे भूस्खलनग्रस्त म्हणून नोंद केलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहवालाचा व मागील दहा वर्षांत किनारपट्टीची धूप झाल्‍यामुळे गोव्याने सुमारे 15.2 हेक्टर जमीन गमावली आहे, याचाही आयोगाने अभ्यास करावा असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

"अंत्यसंस्कारावेळी मृत स्त्री-पुरुषांना नग्न करण्याची अन्यायकारक प्रथा बंद करणे गरजेचे आहे. एखाद्याच्‍या मृत्यूनंतर त्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान व आदर केला पाहिजे. सरकारने अशा अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी कायदा करण्‍याचा विचार केला पाहिजे."

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT