Employees met MLA Vijay Sardesai alleging harassment under ISMA Act by HR of Cipla Company Dainik Gomantak
गोवा

सिप्ला कंपनीच्या एचआरकडून इस्मा कायद्यांतर्गत छळवणूक; कर्मचाऱ्यांनी घेतली आमदार सरदेसाईंची भेट

सिप्ला कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

सिप्ला कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. तीन दिवसांपूर्वी वेर्णा येथील औद्योगिक परिसरात असलेल्या सिप्ला कंपनीत महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना कर्मचाऱ्यांनी आरोपांची सरबत्ती लावली आहे.

कर्मचाऱ्यांनी आता थेट कंपनीवर सतावणुकीचा आरोप केला आहे. शनिवारी (दि. 27 जुलै) पणजीतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन करत कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, या प्रकरणाला राजकीय वळणही मिळताना दिसत आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांना भेटून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपलं गार्‍हाणं मांडलं.

दरम्यान, सिप्ला कंपनीच्या एचआरकडून इस्मा कायद्यांतर्गत आपली छळवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी आज आमदार विजय सरदेसाई यांना भेटून एक निवेदन दिले. ज्यामध्ये त्यांनी कंपनीच्या एचआरकडून आपली छळवणूक झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, सरदेसाईंकडून हा मुद्दा विधानसभेत मांडू असे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

पणजीतील आझाद मैदानावर सिप्ला कंपनीच्या सुमारे तीनशे कामगारांनी एकत्र येत निषेध आंदोलन केलं. गेल्या दोन वर्षापासून कंपनी सतावणूक करत असल्याचा आरोप कामगारांनी केला. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आसाम, सिक्कीम सारख्या राज्यात कर्मचाऱ्यांची बदली केली जात असून, हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली.

कर्मचाऱ्यांनी बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई शुक्रवारी अधिवेशनात उपस्थित केला होता. एका कर्मचाऱ्यांने पत्र लिहून त्यांना याबाबत माहिती दिल्याचा उल्लेख सरदेसाईंनी सभागृहात केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; चर्चा ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याच्या सुट्टीची

Illegal Constructions: 'बेकायदा बांधकामांप्रकरणी 7 एप्रिलपर्यंत अहवाल द्या'! गोवा खंडपीठाचा इशारा; अन्यथा कडक कारवाईची शक्यता

Luthra Brothers: म्‍हापसा पोलिसांकडून 'लुथरा बंधूं'ना अटक! बनावट NOC प्रकरण; 5 दिवसांची पोलिस कोठडी

VIDEO: मॅनेजरने काम सांगितले, संतप्त वेटरने केला खुनी हल्ला; वागातोर परिसरात खळबळ

Hyderabad Drugs Case: हैदराबादमध्‍ये 'ड्रग्‍स पार्टी' आयोजनात गोवा कनेक्‍शन उघड! डीजे क्लिंटनवर संशय; 12 जणांना अटक

SCROLL FOR NEXT