Quepem Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Quepem Panchayat Election: केपे तालुक्यातील पंचायत पोटनिवडणुकीत एल्टन डिकॉस्ता यांचे उमेदवार विजयी

बाळ्ळीमठ पोटनिवडणुकीत हर्षद परीट तर शिर्ली बार्से पोटनिवडणुकीत सर्वानंद वेळीप हे विजयी झाले

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Panchayat Election केपे तालुक्यातील बाळ्ळी आणि बार्से या दोन पंचायतीच्या पोट निवडणूकीत केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा पाठिंबा मिळालेले उमेदवार निवडून आले.

बाळ्ळीमठ प्रभागातील पोटनिवडणुकीत हर्षद विठ्ठल परीट तर शिर्ली बार्से पोटनिवडणुकीत सर्वानंद मोनो वेळीप हे विजयी झाले. त्या दोघांनाही आमदार डिकॉस्ता यांनी पाठिंबा दिला होता.

बाळ्ळीमठ प्रभागातील पोटनिवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत हर्षद परीट यांनी आपले प्रतिस्पर्धी रोहिदास लक्ष्मण नाईक यांचा 19 मतांनी पराभव केला. परीट यांना 118तर रोहिदास नाईक यांना 99 मते मिळाली.

शिर्ली बार्से येथे सर्वानंद मोनो वेळीप व दिनेश रामा वेळीप यांच्यांत सरळ लढत झाली होती. त्यांत सर्वानंद वेळीप 34 मतांनी विजयी झाले.सर्वानंद यांना 230 तर दिनेश यांना 196 मते प्राप्त झाली. निर्वाचन अधिकारी म्हणून केपेचे मामलेदार प्रतापराव गांवकर यांनी काम पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

SCROLL FOR NEXT