Electricity Shortage  Gomantak Digital Team
गोवा

Electricity Shortage In Sattari : नगरगाव भागात 18 तास बत्ती गुल

ग्रामस्थ हैराण : पंचायत क्षेत्रात वीज समस्या नित्याचीच; बंच केबल ठरतेय त्रासदायक

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी तालुक्यात विजेची समस्या गंभीरच होत चालली आहे. पावसाच्या पहिल्याच थेंबात वीज पुरवठा खंडित होणे नित्याचेच बनले आहे. विशेषतः नगरगाव पंचायत भागातील अनेक गावात वीज समस्या जटीलच बनली आहे. वीज बंच केबल अगदी त्रासादायक ठरत आहेत.

नगरगाव पंचायत भागाताल गावात वारंवार वीज गायब होते आहे. काल रविवारी नगरगाव पंचायत भागातील सुमारे आठ ते नऊ गावांमध्ये रात्री १० वाजता गेलेली वीज आज सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अठरा तासांनी पूर्ववत झाली होती.

काल रात्री पासून वीज पुरवठा खंडितच होता. केवळ पावसामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे कारण तरी काय, असा सवाल करून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

नगरगाव कोदाळ नानोडा मार्गावर येथे भागात वारंवार बंच केबल शॉर्ट सर्किट होऊन जळत असते. त्यामुळे बंच केबल चांगल्या प्रतीच्या घातलेल्या नाहीत असा आरोप होत आहे. शहरात दोन मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला तर लोकांना लगेच त्रास होऊ लागतो.

पण ग्रामीण भागात मात्र लोकांनी कितीही आवाज उठविला तर त्याकडे वीज खात्याकडून दुर्लक्ष केले जाते. नगरगाव पंचायत भागात दररोज बंच केबल शॉर्ट सर्किट होऊन जळतात.

ऐन पावसाळ्यात नळ कोरडे !

नगरगावसह धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, साट्रे, तार, माळोली, देरोडे, माळोली या गावांत वीज खंडित झाल्याने आज दिवसभर पाणी पुरवठा लोकांना करता आला नाही. त्यामुळे एकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील वीज खंडित होत असल्याने जलप्रकल्पातील काम ठप्प होऊन पाणीपुरवठा थांबतो, परिणामी ऐन पावसात नळ मात्र कोरडे होण्याची वेळ आली आहे.

ना वादळ-वारा, ना पडझड, तरीही बत्ती गुल ?

ना मोठे वादळ, ना विजेचा लखलखाट, ना ढगांचा गडगडाट तरीही सात्यत्याने नगरगाव पंचायत भागात धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, साट्रे, तार, माळोली, देरोडे, माळोली आदी गावांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.

निरूपयोगी बंच केबल काय कामाच्या अशी संतप्त प्रतिक्रिया नगरगाव पंचायत भागातील लोकांतून व्यक्त होत आहेत. वीज खाते यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास असमर्थ ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT