Power Cut Issue in Borim Ponda Dainik Gomantak
गोवा

Electricity Problem: फोंडा-बोरीत विजेचा लपंडाव; वीज खात्याने वेळीच लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

एकदा वीजपुरवठा खंडित झाला की तो सुरळीत व्हायला बराच काळ

दैनिक गोमन्तक

Electricity Problem in Borim: राज्यात पावसाने आपली हजेरी लावल्यानंतर लगेचच विजेच्या लपंडावालाही सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बराच वेळ वीज नसल्याने कामांचा खोळंबा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

फोंड्यातील बोरी गावातील सर्वच भागात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात मे महिन्यापासूनच वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे.

एकदा वीजपुरवठा खंडित झाला की तो सुरळीत व्हायला बराच काळ जातो. तोपर्यंत लोकांना अंधारात राहण्याची वेळ येते.

दिवसाही हेच प्रकार घडल्याने विजेवर चालणारे लहान मोठे उद्योगधंदे बंद ठेवावे लागल्याने उद्योजकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर पंखे चालत नसल्याने डासांचा उपद्रवही वाढतो व लोकांची झोपमोड होते. वीज खात्याने याप्रकरणी लक्ष पुरवून वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे शोधून काढून उपाययोजना करावी, अशी त्रस्त नागरिक मागणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT