Electricity|Power Lines
Electricity|Power Lines Dainik Gomantak
गोवा

Electricity in Mapusa: म्हापशात भूमिगत वीज वाहिन्यांचे 50 टक्के काम पूर्ण- जोशुआ डिसोझा

दैनिक गोमन्तक

Electricity in Mapusa: म्हापसा येथील भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाच्या गतीबद्दल आनंद व्यक्त करून उपसभापती डिसोझा म्हणाले की, शहराच्या कार्यक्षेत्रात सुमारे 50 टक्के भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. वीज खात्याने आकय परिसरात वीजवाहिनी प्रवाहित केल्याची माहिती त्यांनी दिली. सुमारे 117 कोटी खर्चून हे काम सुरू आहे.

शुक्रवारी आमदार हे माध्यमांशी बोलत होते. जरी आकय परिसर हा माझ्या मतदारसंघात येत नसला तरी तो म्हापसा शहराच्या अधिकारक्षेत्रात येतो.

वीज खात्याने आकयमध्ये यापूर्वीच वाहिन्या प्रवाहित केल्या आहेत आणि भूमिगत वीज तारांद्वारे वीज सुरू केली आहे. आणि हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे डिसोझा म्हणाले.

चक्रीवादळाच्या वेळेची आठवण करून देताना आमदार म्हणाले की, चक्रीवादळामुळे म्हापशात अनेक झाडे उन्मळून पडली होती. आणि आकय परिसरासह म्हापशात वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी, स्थानिक रहिवाशांना त्रास सोसावा लागला होता.

17 केबल्स हे उपकेंद्रापासून थेट हाऊसिंग बोर्ड ते शहरापर्यंत भूमिगत होतील. आणि एकदा पूर्ण झाल्यावर स्थिर वीजपुरवठा होईल, असेही डिसोझा म्हणाले.

म्हापसा शहर परिसरात मोठे काम हाती घेण्यात येणार असून त्यामध्ये आंगड आणि मार्केट परिसरात एचटी व एलटी या दोन्ही वाहिन्या भूमिगत होतील, असेही ते म्हणाले. त्यांनी गणेशपुरी-हाऊसिंग बोर्डाच्या लोकांनी खोदकामावेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI Issue : ओसीआय प्रकरणी फसवणूक नाही! मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT