electricity Dainik Gomantak
गोवा

शेल्डेतील ‘गृहबांधणी’च्या वीजतारांवर वीज खात्याकडूनच डल्ला

दैनिक गोमन्तक डिजिटल

गृहबांधणी मंडळाच्या शेल्डे येथील वसाहतीत असलेल्या वीज खांबावरील तारा वीज खात्याचे कर्मचाऱ्यांनी काल अकस्मात काढून घेतल्या, त्यामुळे स्थानिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. हे खांब आणि वीजतारा गृहबांधणी मंडळाच्या खर्चाने घातल्या होत्या.

आता त्यांची देखभाल जरी वीज खाते करत असले, तरी वीज खात्याची ही कृती म्हणजे एक प्रकारे दुसऱ्याच्या मालकीच्या मालमत्तेवर मारलेला बेकायदेशीर डल्ला अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

यासंबंधी स्थानिकांनी वीज खात्याच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे या तारा का काढल्या? असा प्रश्न केल्यावर वरून आलेल्या आदेशावरून ही कृती केली, उत्तर त्यांनी दिले. मात्र वीज खात्याची ही कृती म्हणजे राजकीय दबावातून स्थानिकावर उगवलेला सूड आहे, अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली.

या वसाहतीच्या मोकळ्या जागेत यापूर्वी पंचायत निधीतून हॉलीबॉल कोर्ट बांधण्याचे ठरविले होते. पण ही मोकळी जागा वसाहतीतील रहिवाशांच्या वापरासाठी असल्याचा मुद्दा पुढे करून स्थानिकांनी कोर्टात जाऊन ही योजना बंद पाडली होती. या वसाहतीत एक हनुमान मंदिर असून या मंदिराला वीजपुरवठा याच तारांतून होत होता. या मंदिराचा वीजपुरवठा खंडित व्हावा, या एकाच उद्देशाने या तारा काढून नेल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सध्या या मंदिरापुढे काळोख पडू नये, यासाठी स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी सोलर विजेच्या दिव्याची सोय केली आहे. या तारा पुन्हा खांबावर ओढाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT