Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: माडावरुन पडल्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

उमेश गावडे

दैनिक गोमन्तक

केरी येथे आज (रविवारी) झाडावरून पडल्याने वीज कर्मचारी उमेश गावडे यांचा मृत्यू झाला आहे. गावडे हे माडाचे झाड कापण्याच्या निमित्ताने झाडावर चढले असता तेथून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

(Electricity Department worker at Keri died due to falling from Tree )

मिळालेल्या माहितीनुसार केरी येथील उमेश गावडे वय 43 हे माडावर चढत नारळ काढण्याचा, झाडे तोडण्याचा व्यवसाय करतात. या पार्श्वभूमीवर आज ते केरी येथे माड तोडण्यासाठी सुमारे 15 मीटर उंचीवर चढले होते. या दरम्यान त्यांचा तोल गेल्याने ते थेट शेजारच्या तलावात पडले. दुर्दैवाने तलावात पाणी कमी असल्याने ते अधिक जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती देताना फोंडा पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गावडे हे केरी येथील झाडावर चढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. झाड कापताना त्याचे नियंत्रण सुटले आणि ते थेट तलावात पडले, त्यात फारसे पाणी साठले नसल्याने गावडे हे अधिक जखमी झाले. यानंतर त्यांना फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. गावडे यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT