Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील निवडणुकांचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगच घेणार : गुदिन्हो

माविन गुदिन्हो म्हणाले, 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला आहे, त्यात ट्रिपल टेस्ट बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : पंचायत निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्य निवडणूक आयोगाने विरोध करून न्यायालयाचा सल्ला घ्या, अशी शिफारस केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी राज्य निवडणूक आयोगाने अजून तशी कोणतीही लेखी सूचना केलेली नाही, अशी प्रतिक्रिया पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली. (Election Commission will take final decision on Goa elections)

मंगळवारी मडगावात एका कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता, निवडणुकांचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माविन गुदिन्हो म्हणाले, 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला आहे, त्यात ट्रिपल टेस्ट बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय जिथे मुसळधार पाऊस पडू शकतो तिथे निवडणूक घेऊ नका, असेही न्यायालयाने सूचित केले आहे.

उद्योग धोरणावर अधिवेशनात चर्चा

गोव्याचे उद्योग धोरण तयार होत असून येत्या पावसाळी अधिवेशनात ते चर्चेला आणले जाईल. उद्योग सुरू करण्यासाठी जी किचकट पद्धती अवलंबली जाते, ती या नव्या धोरणात सोपी केली जाणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT