Revolutionary Goans Party Dispute Dainik Gomantak
गोवा

RGP Dispute: निवडणूक आयोगाचे पत्र 'आरजी'च्या जुन्याच पत्त्यावर, गुरुवारच्या बैठकीत परब गटाचा पदाधिकारी राहणार उपस्थित; वाद चिघळणार

Revolutionary Goans Party Dispute: रिव्हॉलुशनरी गोवन्स (आरजी) पक्ष कुणाचा, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, मुख्य निवडणूक आयोगाने गुरुवारी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण मनोज परब गटाला दिले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रिव्हॉलुशनरी गोवन्स (आरजी) पक्ष कुणाचा, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, मुख्य निवडणूक आयोगाने गुरुवारी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण मनोज परब गटाला दिले आहे. यावरून परब आणि आमदार वीरेश बोरकर गटात वाद वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मुख्य निवडणूक आयोगाकडून वारंवार राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात येत आहेत. ‘आरजी’ला त्याचे निमंत्रण पक्ष कार्यालयाच्या नोंद असलेल्या पत्त्यावर पाठवले जात आहे. या कार्यालयाचा ताबा परब गटाने घेतला असून, आमदार वीरेश बोरकर गटाने पक्षाचे कार्यालय दुसऱ्या जागी सुरू केले आहे.

परंतु, आयोगाचा पत्राव्यवहार नोंद असलेल्या कार्यालयाशी सुरू असल्याने गुरुवारच्या बैठकीला परब गटाचा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, याबाबत आमदार बोरकर आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शविना नाईक यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत, पत्रव्यवहार आपल्या कार्यालयाशी करण्याची मागणी केली होती. तरीही आयोगाने पूर्वी नोंद असलेल्या पत्त्यावरच पत्रव्यवहार सुरू ठेवल्याने परब आणि बोरकर गट पुन्हा भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Woman Assault: म्हापसा, काणकोणनंतर आता कुडचडे हादरले! महिलेला डोंगराळ भागात नेऊन लैंगिक अत्याचार; संशयित पोलिसांच्या ताब्यात

EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या दुरुस्त करा पीएफ खात्यातील चुका; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून 63 टक्क्यांवर, जुलैपासून मिळणार लाभ

Mapusa Assault Case: म्‍हापसा प्रकरणातील नराधम अखेर पणजीत जेरबंद; 5 दिवसांची पोलिस कोठडी; तांत्रिक पुरावे, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

Minor girl Assault: आणखी एका बालिकेचे शोषण, म्‍हापशापाठोपाठ काणकोण हादरले; 4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संशयित जेरबंद

SCROLL FOR NEXT