Sadanand Sheth Tanawade Dainik Gomantak
गोवा

Rajya Sabha: ठरलं! राज्यसभेसाठी सदानंद शेट तानावडे निश्चित

तवडकर : सुकाणू समितीकडून निवड

गोमन्तक डिजिटल टीम

Rajya Sabha राज्यसभेच्या गोव्यातील एकमेव जागेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव आज भाजप सुकाणू समितीने एकमुखाने निश्चित केले.

हे नाव केंद्रीय निवडणूक समितीला पाठवण्यात येईल आणि दिल्लीतून येत्या दोन दिवसांत तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. भाजप कार्यकारिणीची आज, शनिवारी पणजीत बैठक झाली.

यावेळी हे नाव निश्चित केले, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मुदत 28 जुलै रोजी संपत असल्याने 24 जुलै रोजी मतदान होत असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्याने या निवडणुकीसाठीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.

सध्या राज्यात भाजपची बहुमत असलेली एकहाती सत्ता असून भाजपला राज्यसभेची जागा जिंकणे सहज सोपे आहे.

यासाठी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे नाव यापूर्वीच केंद्रीय नेत्यांकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी त्याला होकारही दिला होता. आज कार्यकारिणीची बैठक झाली.

विरोधकांचे संख्याबळ नगण्य

भाजपकडून या जागेसाठी तानावडे यांचा एकमेव अर्ज सुकाणू समितीसमोर होता. त्याला केंद्रीय समितीची अनुमती आहे. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित आहे. सध्या भाजपकडे स्वतःचे 28 आमदार आहेत.

याशिवाय मगोपचे 2 आणि 3 अपक्ष मिळून 33 आमदार भाजपसोबत आहेत. विरोधकांकडे काँग्रेसचे 3, ‘आप’चे 2, तसेच गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांचे प्रत्येकी 1 असे मिळून सात आमदार आहेत

...तर तानावडे बिनविरोध

राज्यसभेच्या जागेसाठी भाजपमधून सदानंद शेट तानावडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्याला सुकाणू समितीने मंजुरी दिली. भाजपकडील संख्याबळ पाहता तानावडे बहुमताने निवडून येतील. जर विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला नाही, तर तानावडे बिनविरोध निवडून येण्याचीही शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

SCROLL FOR NEXT