Gajanan Kirtikar In Goa Dainik Gomantak
गोवा

Shivsena In Goa: एकनाथ शिंदेंची शिवसेना गोव्यात अन्यायाविरोधात जनआंदोलन उभारणार; गजानन कीर्तीकरांनी सांगितला प्लॅन

Eknath Shinde's Shivsena Enters Goa: गोव्यातील जनता शिंदे यांच्या शिवसेनेला स्वीकारतील. असा विश्वासही कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

Tukaram Sawant

डिचोली: एकनाथ शिंदे यांची शिवसेना अगोदर गोव्यातील बेकायदा गोष्टीविरोधात जनआंदोलन उभारून वातावरण निर्मिती करणार. आणि नंतरच निवडणूक लढविण्याबाबत विचार करणार. असे शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.

येत्या तीन महिन्यात गोव्यात एक लाख शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्याचे उद्धीष्ट ठेवण्यात आले आहे. असेही कीर्तीकर यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आणि लोकांसाठी संघर्ष करणारी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रातील सध्याची गत पाहता, गोव्यातील जनता शिंदे यांच्या शिवसेनेला स्वीकारतील. असा विश्वासही कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात पाऊल ठेवले असून, आज (शनिवारी) डिचोलीतील नानोडे येथे गजानन कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता पार शिबीर पडले. या राज्यव्यापी शिबिरापूर्वी गजानन कीर्तिकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे गोवा राज्यसंपर्क प्रमुख सुभाष सावंत, स्मिता सावंत, शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख उपेंद्र गावकर आदी उपस्थित होते.

अन्याया विरोधात संघर्ष करणार

जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या गोमंतभूमीत खनिज व्यवसाय आदी अनेक बेकायदा गोष्टी घडत आहेत. रोजगार आदीबाबतीत गोमंतकीयांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात शिवसेना संघर्ष करणार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्य तळागाळात नेवून गोव्यात शिवसेनेचे कार्य वाढवून शिवसेनेचा विस्तार करण्यात येईल, असे गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात भाजप युती सरकारचा घटक असली, तरी गोव्यात आगामी निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याबाबतीत विचार झालेला नाही. अगोदर शिवसेना गोव्यात मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. यापुर्वी शिवसेनेमुळेच गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि मनोहर पर्रीकर यांच्यासारखा मुख्यमंत्री गोव्याला मिळाला, असे गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.

तद्नंतर नानोडे येथे पार पडलेल्या शिवसेना शिबिरात गजानन कीर्तीकर आणि सुभाष सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. उपेंद्र गावकर यांनीही विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT