Ek Bharat Shreshtha Bharat Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, सहा दिवसांसाठी मिळेल हिमाचल राज्यात जाण्याची संधी

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धतींचे ज्ञान यांची देवाणघेवाण वाढावी असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Pramod Yadav

Ek Bharat Shreshtha Bharat: युवा संगम कार्यक्रमाअंतर्गत 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही संकल्पना भारतभर राबवली जात आहे. विविध राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन तेथील संस्कृती जाणून घेण्याची संधी दिली जात आहे.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धतींचे ज्ञान यांची देवाणघेवाण वाढावी असा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यातील काही विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) जाण्याची संधी मिळणार आहे.

काय आहे योजना?

'एक भारत श्रेष्ठ भारत' अंतर्गत गोव्यातील 45 विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेश या राज्यात जाण्याची संधी मिळणार आहे. अभ्यास सहल म्हणून पाच ते सहा दिवस या विद्यार्थ्यांना हिमाचलमध्ये राहता येईल. या काळात विद्यार्थ्यांना तेथील संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धती जाणून घेता येईल.

असा करा अर्ज?

यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Apply Online) पद्धतीने अर्ज करता येईल. त्यानंतर राज्यातील निवडक 45 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिमाचलमध्ये जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना 'एक भारत श्रेष्ठ भारत' (ebsb.aicte-india.org) च्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल. 09 एप्रिल 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येईल.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाची घोषणा केली होती. डिसेंबर 2022 ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रम आणि 'आझादी का अमृतमहोत्सव' अंतर्गत गोव्याचे शालेय विद्यार्थी टाटानगर, झारखंड येथे रवाना गेले होते.

दरम्यान, यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिमाचलमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. भारताची एकता आणि अखंडता मजबूत होण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रम महत्वाचा मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT