Oberoi Resort Goa Dainik Gomantak
गोवा

Oberoi Resort Goa: दक्षिण गोव्यात होणार 421 कोटींचे आलिशान ओबेरॉय रिसॉर्ट; EIH चे शेअर्स 8 टक्क्यांनी वधारले

Oberoi Resort: हॉटेल व्यवसायाशी संबंधित असलेल्या EIH लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगलीच तेजी दिसून आली.

Manish Jadhav

Oberoi Resort Goa: गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन क्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक मोठ्याप्रमाणात गोव्याला भेट देतात. दरम्यान, सावंत सरकार राज्यात गुंतवणुक वाढण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुंतवणुदारांना गुंतवणुक करण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत याची खबरदारीही घेतली जाते. दरम्यान, राज्यात हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीला चांगला वाव आहे.

यातच आता, हॉटेल व्यवसायाशी संबंधित असलेल्या EIH लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगलीच तेजी दिसून आली. दक्षिण गोव्यातील केळशी बीच येथे लक्झरी ओबेरॉय रिसॉर्ट बांधण्याची योजना जाहीर करताच EIH लिमिटेडचे शेअर्स तब्बल 8 टक्क्यांनी वधारले. कंपनी हे रिसॉर्ट तब्बल 52 एकरात बांधणार आहे. या लक्झरी रिसॉर्टमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 90 रुम आणि सुइट्स असतील. या माध्यमातून रोजगाराला चालना मिळणार आहे.

दरम्यान, या प्रोजेक्टसाठी तब्बल 421 कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. तर प्रस्तावित लक्झरी रिसॉर्ट 1 ऑक्टोबर 2027 पासून सुरु होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 28 मार्च रोजी झालेल्या बैठकीत गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ओबेरॉय फ्लाइट सर्व्हिसेसला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 73 अंतर्गत, मुंबईतील राज्य कर उपायुक्त कार्यालयाने ₹1,51,630 चा दंड ठोठावला होता. दरम्यान, EIH Ltd चे शेअर्स आज BSE वर 5.73% वाढून प्रत्येकी ₹474.5 वर ट्रेड करत होते. गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 104.57% आणि गेल्या एका वर्षात 189.72% पेक्षा जास्त वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT