Illegal Resort At Cola Beach: कोला बीच येथील 9 पैकी 6 बीच रीसॉर्ट विनापरवाना?

बेकायदा रीसॉर्टमध्ये माजी सरपंचांच्या रीसॉर्टचाही समावेश असल्याची चर्चा
Illegal Resort At Cola Beach:
Illegal Resort At Cola Beach:Dainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Resort At Cola Beach: पर्यटन हंगामाला सुरवात होण्यास आता कमी अवधी शिल्लक राहिलेला असताना गत हंगामात विनापरवाना रीसॉर्ट चालवल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दक्षिण गोव्यातील कोला येथील 9 पैकी 6 बीच रीसॉर्ट हे विनापरवाना सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Illegal Resort At Cola Beach:
Chorao Ferry Boat: चोडण येथे फेरीबोटीचा तराफा तुटला; बोटीतच अडकून पडले प्रवासी

कोला येथील 9 पैकी केवळ 3 रीसॉर्टकडे व्यापार परवाना आहे. गत पर्यटन हंगामातील ही स्थिती आहे. दरम्यान, यातील अनेक रीसॉर्ट अजूनही विनापरवाना सुरू असल्याची माहिती आहे. शिवाय बंदी काळातही ही रीसॉर्ट सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

शिवाय यातील एक रीसॉर्ट हे येथील माजी सरपंचांचे असल्याचेही सांगितले जात आहे. अजय पागी हे कोला व्हिलेज पंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्यांच्या रीसॉर्टचाही यात समावेश असल्याचे बोलले जात आहे. ते सध्या पंचायतीचे सदस्य आहेत.

त्यांच्यावरही गत पर्यटन हंगामात व्यापार परवान्याशिवाय रीसॉर्ट चालवल्याचा आरोप केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com