Eight witnesses summoned in connection with 2001 India vs Australia ticket scam at Nehru Stadium in goa Dainik Gomantak
गोवा

तिकीट घोटाळाप्रकरणी आठ साक्षीदारांना समन्स

नेहरू स्टेडियमवर 2001 साली भारत व ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामन्या दरम्यान मैदानाच्या कुवतीपेक्षा जास्त प्रेक्षकांना प्रवेश दिल्यामुळे चेंगरा चेंगरी झाली होती

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगाव येथील प्रथम वर्ग वरिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी दिवाणी न्यायाधीश यांनी बनावट तिकीट घोटाळा प्रकरणी 8 साक्षीदारांना नव्याने समन्स पाठविण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी सुनावणी 4 मार्च रोजी निश्र्चित करण्यात आली आहे. (Eight witnesses summoned in connection with 2001 India vs Australia ticket scam at Nehru Stadium in goa)

गोवा (Goa) क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकरसह आठ जणांनी बनावट तिकीट विक्री प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात माजी सचिव विनोद फडके, माजी खजिनदार रामा शंकरदास, तिकीट कॉन्ट्रेक्टर चिन्मय फळारी, त्यांचा भाऊ देवदत्त फळारी, एकनाथ नाईक, गंगाराम भिसे, व्यंकटेश देसाई, ज्योकीम पिरीस यांची या आरोपपत्रात नावे आहेत.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर 2001 साली भारत व ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामन्या दरम्यान मैदानाच्या कुवतीपेक्षा जास्त प्रेक्षकांना प्रवेश दिल्यामुळे व त्याद्वारे चेंगरा चेंगरी झाल्या प्रकरणावरील सर्वांवर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी 200 जणांची चौकशी केली होती.

विनयभंगप्रकरणी एकास सशर्त जामीन

दरम्यान मडगावच्या (Margao) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी याने रुमडामळ दवर्ली येथील 40 वर्षीय आनंद लुहेराला विनयभंग खटला प्रकरणी सशर्त जामीन मंजूर केला. सासष्टी मधील एका 22 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी कोलवा पोलिसांनी लुहेराला अटक केली होती. न्यायालयाने लुहेराला दहा हजार रुपये व तेवढ्याच रकमेची एक हमी देणारा व्यक्ती तसेच त्याने पोलिस स्थानकाला भेट देणे या अटीवर जामीन मंजूर केला. कोलवा पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली होती व पोलिस उपअधिक्षक दिपा देयकर यानी भारतीय दंड संहितेच्या 354 कलमाखाली आनंद लुहेरा विरोधात तक्रार नोंद केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT