king Cobra Dainik Gomantak
गोवा

देवघरात आठ फुट किंग कोब्रा लपल्याने तारांबळ, पैंगीणमधील धट

पैंगीण येथील पुतू सुदीर याच्या देवघरात लपून बसलेल्या आठ फुट किंग कोब्राला जीवदान.

दैनिक गोमन्तक

वेलवाडा: पैंगीण येथील पुतू सुदीर याच्या देवघरात आठ फुट किंग कोब्रा लपून बसलेला अढळला आहे. या किंग कोब्राला आज सर्पमित्र सतीश पैगीणकर व वनखात्याच्या संतोष यांनी पकडून जीवदान दिले आहे. आंबेली सत्तरी येथे बागायतीत आलेल्या बारा फुटी लांबीच्या किंग कोब्रा सापडल्याची घटना ताजी असतानाच, सूमारे आठ फूट लांबीचा हा किंग कोब्रा राहत्या घरात सापडला आहे. सुदीर यांच्या देवघरात तो लपलेला होता. आज देवघरात पुजा व साफसफाई करताना त्यांच्या ते लक्षात आल्याने त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. (eight-foot King Cobra lurks in the house temple in goa)

आंबेली सत्तरीत पकडला 12 फुटी किंग कोब्रा

आंबेली सत्तरी येथे बागायतीत आलेल्या बारा फुटी लांबीच्या किंग कोब्रा पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. सर्पमित्र विनोद सावंत यांनी आंबेली येथे तातडीने सुपारी कुळागर बागायतीत लहान पाट पाण्याच्या ठिकाणी किंग कोब्राला मोठ्या धाडसाने पकडले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घडली होती.

आंबेली येथे गोविंद गावडे यांच्या बागायतीत सदर साप वावरत होता. विनोद सावंत यांना याची माहीती देण्यात आल्यावर सावंत यांनी तत्काळ आंबेली येथे जाऊन चोख कामगिरी बजावली. साप पकडल्याची माहीती म्हादई वाईड लाईफ विभागाचे वनअधिकारी शामसुंदर गावस यांना देण्यात आली. या धाडसी कामगिरी बद्दल विनोद सावंत यांचे अभिनंदन होते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT