Egg Prices Increased In Goa Dainik Gomantak
गोवा

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Egg Prices Increased In Goa: एकाबाजूने मासळी महाग झाली असतानाच, आता बॉयलर अंडीही पुन्हा भाव खाऊ लागली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Egg Prices Increased In Goa: एकाबाजूने मासळी महाग झाली असतानाच, आता बॉयलर अंडीही पुन्हा भाव खाऊ लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून महाग झालेली बॉयलर अंडी स्वस्त होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट अंड्यांच्या दरात आता वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून बॉयलर अंड्यांच्या घाऊक दरात चढउतार होत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत अंड्यांच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. बॉयलर अंड्यांच्या दरात होणारा चढउतार पाहता आणखी काही दिवस तरी अंड्यांना तेजी येण्याची शक्यता आहे. काही घाऊक विक्रेत्यांकडूनही तसे संकेत मिळाले आहेत.

आधीच मासळीचा तुटवडा असून ती महाग झाली आहे. आता अंड्यांचाही भाव वाढू लागल्याने सामान्य खवय्यांना जिभेला लगाम घालावा लागत आहे. बॉयलर अंडी महाग होण्याचे नेमके कारण मात्र विक्रेत्यांकडून मिळत नाही. मात्र, अवकाळी पावसामुळे कर्नाटक राज्यातून आवक कमी झाली आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर मासळी महाग झाल्याची संधी साधून आणि हॉटेल रेस्टॉरंटमधून मागणी असल्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ केली असावी, असा अंदाज ग्राहक व्यक्त करीत आहेत. अंड्यांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणीही ग्राहकांकडून होत आहे.

शंभर अंडी ६१५ रुपये

कर्नाटक राज्यातून डिचोलीत बॉयलर अंड्यांची आयात होत असते. बॉयलर अंड्यांच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. महिन्यापूर्वी ५५० रुपये शंभर नग, असे अंड्यांचे घाऊक दर होते. त्यात आता वाढ होताना शंभर नगामागे ६१५ रुपये, असे अंड्यांचे दर झाले आहेत. ७० रुपयांवरून आता ८५ रुपये डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. काही ग्रामीण भागात तर ९० रुपये डझन या दराने अंड्यांची विक्री होत आहे. मध्यंतरी तीन महिन्यांपूर्वी ६०० रुपये शेकडा असे अंड्यांचे घाऊक दर झाले होते. मात्र, गेल्या महिन्यापर्यंत हळूहळू त्यात घसरण होताना शंभर अंडी ५५० रुपये असे दर झाले होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT