Vedanta Mining Truck Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: पिळगावमधील आंदोलन मिटविण्यासाठी प्रयत्न जारी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Bicholim Mining Dispute: गेले महिनाभर पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी ''वेदांता'' खाणीवरील रस्ता अडविल्याने अखेर सार्वजनिक रस्त्यावरुन खनिज वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Farmers Protest Vedanta Mining Dispute

डिचोली: पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन मिटविण्यासाठी सरकार तसेच ‘वेदांता’ च्या पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. शेतीच्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूने कपात केलेल्या कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांसह कामगारांची मागणी मान्य झाली तर पुढील आठवड्यापर्यंत आंदोलनाचा गुंता सुटण्याची शक्यता वाढली आहे.

गेले जवळपास महिनाभर पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी ''वेदांता'' खाणीवरील रस्ता अडविल्याने अखेर गेल्या शुक्रवारपासून सार्वजनिक रस्त्यावरुन खनिज वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

आम्हाला आमच्या शेती परत हव्यात, ही मागणी पुढे करुन शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात शासकीय पातळीवर तसेच मुख्यमंत्री आणि आमदारांसह बैठक झाली. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भातचा ''गुंता'' अद्याप सुटलेला नाही. आता कंपनीने शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात सकारात्मक पवित्रा घेतला आहे. अशी माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी बैठकीची शक्यता

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रूपाने शेत जमिनीच्या प्रती चौरस मीटरमागे ५ हजार ४०० रुपये देवून ही रक्कम पाच वर्षांत अदा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याचे बाकी असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूने, कपात केलेल्या कामगारांच्या मागणीवरही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न जारी आहेत. खाणबंदी काळातील ४८ महिन्यांचे शिल्लक अर्धवेतनासह थकबाकी तसेच ‘रिट्रेंच’ योजनेंतर्गत अतिरिक्त ४५ दिवसांचा लाभ द्यावा. हा कपात केलेल्या कामगारांच्या बाबतीत प्रस्ताव असल्याचे समजते. दरम्यान, येत्या शुक्रवारी (ता. २०) रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांची एक बैठक होणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT