Digambar Kamat  Daink Gomantak
गोवा

Davarlim News : दवर्लीत लवकरच शैक्षणिक हब : दिगंबर कामत

Digambar Kamat : महिला नूतन हायस्कूलच्या विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते अतिथी म्हणून उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी,दवर्लीतील शैक्षणिक हबसाठी जागा राखून ठेवली असून दगडी कुंपण बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या शैक्षणिक हबचा आराखडा तयार करण्याचे काम हातात घेण्यात आले आहे, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली.

किती शाळांना तिथे सामावून घेता येईल, याचा निर्णय घेता येईल, असे आमदार दिगंबर कामत यांनी आज मडगावात सांगितले. महिला नूतन हायस्कूलच्या विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते अतिथी म्हणून उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, या शैक्षणिक हबचे काम प्राधान्य क्रमाने सुरू केले जाईल. सरकारने जे काही नियोजन केले आहे, त्याप्रमाणे या संपूर्ण शैक्षणिक हबला एक परिपूर्ण मैदान तसेच ५०० आसनांची व्यवस्था असलेले सभागृह असेल. या मैदान व सभागृहाचा वापर येथील शाळांना करता येईल. त्यामुळे प्रत्येक शाळेला आपले वेगळे मैदान किंवा सभागृह बांधण्याचा प्रश्र्न उद्‌भवणार नाही.

तत्पूर्वी समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुदिन नायक यांनी दवर्ली येथील शैक्षणिक हबसाठी सरकारने त्वरित प्रयत्न सुरू केले पाहिजेत, असे प्रतिपादन केले होते. ज्या जागेत हे शैक्षणिक हब होणार आहे, त्या जागेत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.

कुंपण बांधण्याच्या कामाला कमीत कमी एक ते दोन वर्षे लागतील. त्यानंतर शाळा इमारती बांधकामास पाच वर्षे लागतील. तोपर्यंत मडगावातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार आहे, नायक यांनी सांगितले.

४० वर्षांनंतर शैक्षणिक धोरण

नव्या शैक्षणिक धोरणा संदर्भात बोलताना कामत म्हणाले, ४० वर्षांनंतर देशात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. हे धोरण नवे असल्याने सुरवातील थोड्या त्रुटी असतीलच, पण क्रमाक्रमाने या त्रुटी दूर केल्या जातील.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित घटकांशी चर्चा सुरू केली असून त्यांना विश्र्वासात घेऊनच हे धोरण कार्यान्वित केले जाणार आहे. प्राथमिक स्तरावर या धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT