Panjim Casinos Raid Dainik Gomantak
गोवा

Panjim Casinos Raid: मांडवी तीरावरील चार कॅसिनोंवर 'ईडी'चे छापे

Panjim Casinos Raid: कोट्यावधींची ऑनलाईन उलाढाल करणाऱ्यांची झाली झाडाझडती

दैनिक गोमन्तक

Raid Casinos Around Panjim: मांडवी नदीच्‍या पात्रात ठाण मांडून बसलेल्‍या, परंतु वादग्रस्‍तही बनलेल्‍या चार कॅसिनोंवर सोमवारी सक्‍त वसुली संचालनालयाने छापे टाकले.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जे कॅसिनो ऑनलाईन व्‍यवहार चालवत होते, त्‍यांच्‍यावर प्रामुख्‍याने हे छापे टाकण्‍यात आले. हा व्‍यवहार कित्‍येक हजार कोटींचा असल्‍याची माहितीही समोर आली आहे.

सदर छापे सायंकाळी ७ वाजण्‍याच्‍या सुमारास सुरू झाले. त्‍या अंतर्गत उशिरापर्यंत कारवाई सुरू होती, अशी माहिती कॅसिनो उद्योगातील एका ज्‍येष्‍ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्‍कत’ला दिली.

गोव्‍यातील कॅसिनो उद्योगावर अनेक आरोप आहेत. विशेषतः काळा पैसा अधिकृत करून देण्‍याचे देशातील हे प्रमुख केंद्र बनले आहे.

पाच राज्‍यांच्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर अनेक नेते व त्‍यांचे पक्ष येथे काळा पैसा अधिकृत करून घेत असल्‍याचाही आरोप आहे.

सक्‍त वसुली संचालनालयाने छापे टाकल्‍यानंतर कॅसिनोंवर काम करीत असलेल्‍या अनेक कर्मचाऱ्यांना वेगळे बसवून त्‍यांची जबानी घेतली जात होती. त्‍यावेळी उपस्‍थित ग्राहकांनाही काही प्रश्‍‍न विचारण्‍यात आले. त्‍यामुळे उपस्‍थितांमध्‍ये एकच खळबळ माजली.

गोव्‍यामध्‍ये कॅसिनो व्‍यवसाय प्रचंड फोफावला असून, तेथे छापे पडत नाहीत, असा समज देशभर आहे. त्‍यामुळे आजच्‍या छाप्‍यांनी एक वेगळाच संदेश गेला आहे. देशभर या प्रकाराने खळबळ निर्माण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT